शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदानकेंद्रे असणार ''वाॅटरप्रुफ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 16:07 IST

विधानसभेच्या निवडणुकीवर पावसाचे सावट असल्याने प्रशासनाने देखील खबरदारी घेतली असून पुण्यातील सर्व मतदानकेंद्र वाॅटरप्रुफ असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुणे:  लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी कमी झाली होती.परंतु,आता पाऊस, वादळ आले तरीही पुण्यातील मतदार विधानसभा निवडणुकीसाठी नक्की मतदान करतील आणि जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवतील,असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.तसेच सर्व मतदान केंद्र वॉटर प्रुफ असून मतदारांना मतदान करण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत,असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवल किशोर राम म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 आॅक्टोबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करावे. देशातील सर्वाधिक सुशिक्षित,प्रबुध्द नागरिक अशी पुण्यातील नागरिकांची ओळख आहे. त्यामुळे ‘आंधी हो या तुफान हम करेंग जरूर ईस विधानसभा के लिए मतदान’हा विचार घेवून जिल्ह्यातील मतदारांनी मतदान करून मतदानाचा टक्का वाढवावा.

पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांना भेट देवून मतदान केंद्रांची तपासणी केली असून सर्व ठिकाणी योग्य व्यवस्था असल्याची खात्री केली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर पाण्याची गळती होत नाही. मदारांना किंवा मतदान कक्षातील कर्मचा-यांना, ईव्हीएमला पावसामुळे कोणताही त्रास होणार नाही; याची दक्षता घेतली आहे. पावसावर मात करण्यासाठी मतदान केंद्रावर पूर्णपणे वॉटर प्रुफ व्यवस्था केली आहे,असेही नवल किशोर राम यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PuneपुणेVotingमतदान