शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra: उत्तरेकडील बर्फवारीमुळे राज्यातील थंडी वाढण्याची शक्यता!

By श्रीकिशन काळे | Updated: January 30, 2024 17:21 IST

उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो....

पुणे : उत्तरेकडे सुरू असलेल्या पाऊस आणि बर्फबारीमुळे थंडी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून, सध्या तेथे पडत असणाऱ्या धुके व बर्फबारीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार दि. ४ फेब्रुवारी पर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. 

सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच १ फेब्रुवारी पर्यंत जाणवणार आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री से. ग्रेड म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने, तर पुणे सातारा कोल्हापूर सांगली व छ. सं. नगर येथे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक तर दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असू शकते, असा अंदाज आहे. विदर्भात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १२ डिग्री से.ग्रेड (म्हणजे सरासरी इतके) तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असू शकते, असे वाटते.

उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीसारखी थंडी पहिल्या आठवड्यात जाणवेल. नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दीड डिग्रीने अधिक राहून म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल, असेही खुळे यांनी सांगितले. पुण्यात थंडी कायम !

सध्या पुणे शहरामध्ये १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. शिवाजीनगरला १३.६ अंश सेल्सिअस तापमान असून, वडगावशेरीला मात्र १९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरात हा गारठा आणखी दिवस असा राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र