शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बँकेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना खटल्यातून वगळले ; डीएसके प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 20:57 IST

अधिकाराचा गैरवापर करून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन बड्या अधिका-यांना अखेर या खटल्यातून सोमवारी वगळण्यात आले.

पुणे : अधिकाराचा गैरवापर करून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन बड्या अधिका-यांना अखेर या खटल्यातून सोमवारी वगळण्यात आले. 

तीनही अधिका-यांबाबत पोलिसांनी दोन महिन्यांपुर्वी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. त्यानुसार एमपीआयडी कायदा विशेष न्यायाधीश डी. जी. मुरुमकर यांनी  बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार वेदप्रकाश गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत गुन्ह्यातून वगळण्यात आले. डीएसके यांना कर्ज देताना बँक ऑफ महाराष्ट्राने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र शासनाने घालून दिलेले निर्देश, सुचना व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले होते. पण या निष्कषार्तून ज्यांच्यावर कारवाई करायची त्याच व्यक्तींना गुन्ह्यातून वगळण्यात आल्याची नामुष्की पोलिसांवर आली आहे.

बँक अधिका-यांच्या वतीने अ‍ॅड. हर्षद निंबाळकर व अ‍ॅड. शैलेश म्हस्के यांनी काम पाहिले. या तीन अधिका-यांप्रमाणे बँकेचे विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना देखील या खटल्यातून वगळावे म्हणून अर्ज करण्यात येणार असल्याचे माहिती अ‍ॅड. म्हस्के यांनी दिली. या प्रकरणात चारही अधिका-यांना २० जून २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. डीएसके उद्योग समुहाने त्यांच्या गुंतवणूकदारांची केलेली फसवणूक व त्यांचा रक्कमेचा केलेला अपहार यामध्ये अटक आरोपी हे सहभागी असल्याबाबत कोणताही पुरावा तपासामध्ये निष्पन्न झालेला नाही. डीएसके प्रकरणात कोट्यवधी रुपयांची फसवणूक व त्यांच्या रकमेचा केलेला अपहार या गुन्ह्यामध्ये बँक अधिकारी यांनी मुख्य आरोपींंनी रचलेल्या फौजदारी कटाला मदत केल्याचे पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. बँक अधिकारी यांनी गुंतवणुकदारांकडून पैसा स्विकारला नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधी संरक्षण अधिनियमच्या (१९९९) कलम ३ व ४ नुसार पुरावा निष्पन्न झालेला नाही, असा या अहवालात पोलिसांनी दोन महिन्यांपुर्वी दिली होता. 

पुरावे नसल्यानेच दिला होता क्लोजर रिपोर्ट बँकेच्या अधिका-यांचा या गुन्ह्यात काहीच भुमिका नाही, असे आम्ही पहिल्यापासून सांगत होतोे. पुरावे न मिळाल्याने अखेर त्यांच्या विरोधात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. बँकेने काही चुकीचे काम केले असेल तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार रिझर्व बँक ऑफ इंडियाला आहे, असे बचाव पक्षाने सांगितले. तर न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर याबाबत पुढील भूमिका घेण्यात येईल, असे याप्रकरणी नियुक्त विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सांगितले. 

कट रचून कर्ज दिल्याचा आरोप अधिका-यांनी डिएसकेडीएल कंपनीला १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचे पोलिसांनी म्हटले होते. तसेच सीए घाटपांडे यांनी २००७-०८ ते २०१६ पर्यंतच्या लेखापरीक्षण अहवालात डीएसकेडीएल कंपनीची सत्य परिस्थिती नमूद केली नाही. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, विजया बँक, सिंडीकेट बँक, युनियन बँक, आयडीबीआय व इतर बँकांनी दिलेले कर्ज विनियोग दाखले खोटे असून, ते घाटपांडे यांनी केले. त्यासाठी आरोपींनी कट केला असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते.

टॅग्स :Courtन्यायालयD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे