शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन पाटलांनी अर्ज भरला; पण अपक्ष उमेदवाराने इंदापुरात वाढवले आजी-माजी आमदारांचे टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:33 IST

प्रवीण माने यांनी बंडखोरी करत काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यंदा इंदापुरात तिरंगी सामना होणार आहे.

Harshwardhan Patil ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कोणत्याही परिस्थितीत इंदापूरमध्ये तुतारीचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात प्रवीण माने यांनी बंडखोरी करत काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यंदा इंदापुरात तिरंगी सामना होणार आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. तिसऱ्या आघाडीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महत्त्वाचे म्हणजे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे उपस्थित नव्हते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे मात्र आता तिरंगी लढत होणार असल्याने आजी-माजी आमदारांची धाकधूक वाढली आहे. इंदापूर विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. हर्षवर्धन पाटील यांनी हातात तुतारी घेतल्याने अस्तित्वात आलेल्या तिसऱ्या आघाडीतून प्रवीण माने की आप्पासाहेब जगदाळे हे उमेदवार असणार, असे निश्चित नव्हते. मात्र, बुधवारी सकाळी 'माझे ग्रामदैवत बाबीरबुवाच्या चरणी नतमस्तक होऊन तेथील गुलाल पुडीत बांधून सभेला आलो आहे. त्या गुलालाची शपथ घेऊन सांगतो की, काहीही केले तरी मी उमेदवारी मागे घेणार नाही. हाताला फक्त कपाळाला गुलाल लावतो. तो उधळण्यावर फक्त तुमचा अधिकार आहे,' अशा शब्दात आपला इरादा स्पष्ट करत माजी जिल्हा परिषद सदस्य, सोनाई उद्योग समुहाचे संचालक प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रवीण माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर शहरातून मोठी दुचाकी रॅली काढली. सर्व महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. दुसरीकडे माने यांची रॅली भरत शहा यांच्या दुकानासमोर आली. श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे मुकुंद शहा, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच मुकुंद शहा यांचे वडील गोकुळदास शहा यांच्या प्रतिमेला माने यांनी अभिवादन केले. त्यावेळी शहा कुटुंबियांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरगच्च गर्दीत सभाही केली. यावेळी मात्र आप्पासाहेब जगदाळे अनुपस्थित होते.

आप्पासाहेब जगदाळेंची भूमिका निर्णायक १९९५ मध्ये इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यानंतर तत्कालीन अपक्ष उमेदवार निवडून आला होता. तिरंगी लढत झाली तर अपक्ष उमेदवार निवडून येतो हा इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे. मात्र, तिसऱ्या आघाडीतील महत्त्वाचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. जगदाळे यांचा आमदार दत्तात्रय भरणे यांच्याशी विशेष स्नेह आहे. हर्षवर्धन पाटील हे जरी मामा असले तरी त्यांच्याशी सख्ख नाही. काही दिवसांपासून प्रवीण माने किंवा अप्पासाहेब जगदाळे हे दोघेही तिघांच्या समन्वयातून उमदेवार निश्चित करण्यात येईल, असे सांगत होते. मात्र, प्रवीण माने यांनी उमदेवारी अर्ज दाखल केल्याने जगदाळे नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024indapur-acइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस