शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणूकीत ६१ टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 22:03 IST

या निवडणूकीत २५ जागांसाठी राज्यातून एकूण १६४ उमेदवार रिंगणात होते. त्यातील २३ उमेदवार पुण्यातील आहे.

ठळक मुद्दे राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणीची मतदानाची सोय

पुणे : राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीसाठी बुधवारी ६१ टक्के मतदान झाले. कोणताही गैरप्रकार न होता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान जिल्ह्यातील सुमारे १२ हजार ५०९ वकिलांपैकी ७ हजार ६३५ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला.       शिवाजीनगर येथे असलेल्या जिल्हा न्यायालयात चार ठिकाणी बुथ उभारण्यात आले होते. दुपारी १ पर्यंत केवळ ३० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे दुपारपर्यंत अत्यल्प प्रतिसाद मिळल्याचे दिसते. मात्र दुपारी तीननंतर मोठ्या प्रमाणात वकील मतदानासाठी दाखल झाले होते. त्यामुळे लाईन लावून मतदान करावे लागले. दरम्यान निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची खबरदारी न घेण्यात आल्याने काही ठिकाणी तुरळक गोंधळ झाला. तर निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे कर्मचारी व यंत्रणा देण्यात आली नसल्याची नाराजी काही उमेदवरांनी व्यक्त केली. मतदानासाठी पुणे बार व जिल्हातील सर्व बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी मदत केली. दिलेल्या कालावधीत शांततेत निवडणूक पार पडल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार यांनी दिली.      शहरासह उपनगरांतील अनेक वकील मतदान असल्यानेन्यायालयात आले होते. तसेच उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी अनेक ज्युनिअर वकीलही जातीने कोर्टात हजर होते. उमेदवारांची माहिती देण्यासाठी कोर्टात ठिकठिकाणी टेबल मांडण्यात आले होते. या सर्वामुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी निर्माण झाली होती. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणीची मतदानाची सोय करण्यात आली होती. पुण्यात शिवाजीनगर, बारामती, भोर, दौंड, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, जुन्नर, राजगुरूनगर, सासवड, वडगाव मावळ, पिंपरी येथे मतदानाची केंद्रे देण्यात आली होती. या सर्व ठिकाणी शांततेत मतदान झाले. या निवडणूकीत २५ जागांसाठी राज्यातून एकूण १६४ उमेदवार रिंगणात होते. त्यातील २३ उमेदवार पुण्यातील आहे. महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यांसह दादर नगर हवेली आणि दिव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशात ही निवडणूक पार पडली. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी  मतदानाची सोय करण्यात आली होती. 

..............................

पार्किंग दिवसभर फुल्ल व कोंडीमतदानासाठी अचनाक मोठ्या प्रमाणात वाहने दाखल झाल्याने न्यायालच्या आतील व बाहेरील पार्किंग फुल झाले होते. त्यामुळे अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी गाड्या लावण्याने चारकाही वाहन आल्यास कोंडी होत होती. एक नंबर गेटजवळ वाहनांची सतत गर्दी होत असल्याने संतेचीपासून कार्टाकडे जाणा-या अंडरग्राऊंड पुलाखाली कोंडी झाली होती. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालयadvocateवकिलElectionनिवडणूक