शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

12th Result | पुणे विभागात सोलापूर जिल्हा ठरला दुसऱ्यांदा अव्वल, पुण्याचा नंबर शेवटचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 20:20 IST

पुण्याची एकूण टक्केवारी ९१.४६ टक्के ...

पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारवी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर केला. यात पुणे विभागात सोलापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. सोलापूर जिल्ह्याची टक्केवारी ९४.१५ ऐवढी आहे. त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्याचा निकाल ९३.६० टक्के लागला आहे. तर पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला असून निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. पुणे विभागात २० हजार १५१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तर गैरमार्गाने परीक्षा दिल्याने तीन विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ. वंदना वाहूळ आणि विभागीय सचिव अनुराधा ओक यांनी दिली.पुणे विभागात एकूण २ लाख ४९ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख २९ हजार ६४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाची निकालाची एकूण टक्केवारी ९२.६१ आहे. त्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.५९, तर मुलांचे ९१.०४ इतके आहे. तर पुनपरीक्षार्थी अर्थात रीपीटर विद्यार्थ्यांचा पुणे विभागाचा निकाल ४७.९१ टक्‍के लागला आहे.

सोलापूर जिल्ह्याचा निकाल : (९४.१५ टक्के)सोलापूर जिल्ह्यातील ५४ हजार ७९२ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ४७९ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ५१ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९४.१५ टक्के इतकी आहे. सोलापुरात अनुत्तीर्णाची संख्या ३ हजार ४९७ इतकी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.७५, तर मुलींचे ९६.११ टक्के इतकी आहे.अहमदनगर जिल्ह्याचा निकाल : (९१.४६ टक्के)अहमदनगर जिल्ह्यातील ६४ हजार ९०१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार २३४ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ६० हजार १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर निकालाची टक्केवारी ९३.६० टक्के इतकी आहे. नगर जिल्ह्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ७७७ इतकी आहे. मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९६.४१, तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.५८ टक्के इतकी आहे.

पुणे जिल्ह्याचा निकाल : (९१.४६ टक्के)पुणे जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १०३ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २९ हजार २५७ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून १ लाख १८ हजार २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९१.४६ टक्के इतकी आहे. म्हणजेच पुण्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ११ हजार ८७७ एवढी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.९८ टक्के तर मुलींचे ९३.१९ टक्के आहे.

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकाल