रांजणगाव गणपती देवस्थानच्या वतीने महाप्रसाद पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:03+5:302021-02-05T05:05:03+5:30
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दि. १७ मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये महाप्रसाद बंद ठेवण्यात आला होता. व्यंकटेश राव, ...

रांजणगाव गणपती देवस्थानच्या वतीने महाप्रसाद पुन्हा सुरू
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दि. १७ मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये महाप्रसाद बंद ठेवण्यात आला होता.
व्यंकटेश राव, श्रीमती उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च फाऊंडेशन पुणे व श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या यांच्या वतीने दि. १ फेब्रुवारी २०२१ पासून देवस्थान ट्रस्टमध्ये अखंडित अन्नदान सेवा सुरू करण्यात आली. सदर मोफत अन्नदान चालू होताच अन्नदात्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील श्रीराम इलेक्ट्रिकल अँड ट्रान्सपोर्टचे मालक स्वप्निल खेडे,संजय जगताप (शिक्रापूर) व प्रा. भास्कर रामचंद्र भुसारे (शिरूर) या ३ देणगीदारांकडून प्रत्येकी ११ हजार रुपये अन्नदान देणगी देवस्थान ट्रस्टला देण्यात आल्याचे विश्वस्त अॅड. विजयराज दरेकर व व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे यांनी सांगितले. अन्नछत्राची वेळ दररोज दु.१२ ते २ व रात्री ७:३० ते ९ अशी असून, भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे हिशोबनीस संतोष रणपिसे यांनी सांगितले. या वेळी अन्नदान देणगीदारांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबनीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
रांजणगाव गणपती येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले अन्नदान पुन्हा सुरू करण्यात आले आहे.