म्हाळवडी येथे ८१ जणांनी रक्तदान केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:18 IST2021-05-05T04:18:30+5:302021-05-05T04:18:30+5:30

भोर वार्ताहर म्हाळवडी ग्रामस्थ व भोर युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. प्राथमिक शाळा म्हाळवडी येथे रक्तदान शिबिर ...

At Mahalwadi, 81 people donated blood | म्हाळवडी येथे ८१ जणांनी रक्तदान केले

म्हाळवडी येथे ८१ जणांनी रक्तदान केले

भोर वार्ताहर

म्हाळवडी ग्रामस्थ व भोर युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. प्राथमिक शाळा म्हाळवडी येथे रक्तदान शिबिर कार्यक्रम पार पडला. यात ग्रामस्थ आणि वेळवंड खोऱ्यातील व इतर भोर तालुक्यातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ८१ जणांनी रक्तदान केले.

या वेळी सरपंच दत्ता भाऊ बोडके, लहू बोडके, सदानंद बोडके अरविंद बोडके, सचिन बोडके व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

भोर तालुक्यातील सामाजिक संघटनांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर झाले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, बाप्पू कुंडले, समीर घोडेकर, मनोज धुमाळ, सोपान दनवले, सोपान बैलकर, योगेश खंडाळे, केतन खंडाळे, राहुल पवार, विजय शेटे, सुनील चिकने, ज्ञानेश्वर बैलकर, सागर पावगे, दत्तात्रय तनपुरे, अक्षय बैलकर, सुशांत बोडके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: At Mahalwadi, 81 people donated blood