म्हाळुंगेला खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:08+5:302021-02-23T04:16:08+5:30

महाळुंगे : गाथा फाऊंडेशन व पै. गणेश बोत्रे यूथ फाऊंडेशनतर्फे ‘एक पाऊल माता भगिनींसाठी’ या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी खेळ रंगला ...

Mahalungela Khel Rangala Paithani program | म्हाळुंगेला खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम

म्हाळुंगेला खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम

महाळुंगे : गाथा फाऊंडेशन व पै. गणेश बोत्रे यूथ फाऊंडेशनतर्फे ‘एक पाऊल माता भगिनींसाठी’ या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.

महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी बोत्रे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या उपाध्यक्ष कांचन ढमाले आदी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्या महिलांना प्रत्येकी एलसीडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, सोन्याची नथ व मानाची पैठणी भेट देऊन गौरवण्यात आले. खेळात सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

या वेळी गणेश बोत्रे म्हणाले की, प्रत्येक महिलेमध्ये एक आई, एक बहीण, एक पत्नी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक महिलांमध्ये एक कलाकार पण दडलेला असतो म्हणूनच त्यांच्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी, तसेच इतर महिलांमध्ये जागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हळदी-कुंकू समारंभाचा शेवट करताना महिलांसाठी खेळ रंगला पैठणीच्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

- फोटो

गाथा फाऊंडेशन आणि पै. गणेश बोत्रे फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी आयोजित खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात सहभागी महिला.

Web Title: Mahalungela Khel Rangala Paithani program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.