शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या महाळुंगे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 21:58 IST

दरोडेखोरांकडून एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

चाकण : सराईत गुन्हेगारांकडून कंपनीत शिरून धाडसी सशस्त्र दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील व्ही टेक इंडस्ट्रीज इंडिया प्रा. ली. कुरुळी या कंपनीत हा प्रकार घडला. महाळुंगे पोलिसांनी याप्रकरणी सात सराईत पुरुषांसह २ महिला अशा एकूण नऊ दरोडेखोरांच्या सोमवारी ( दि. २८ जुन ) मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. दरोडेखोरांकडून एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

रोहन विजय सूर्यवंशी ( वय.२८ वर्षे,रा.कासारवाडी, पुणे),राहुल अंकुश सूर्यवंशी (वय.३१ वर्षे,रा.वाकड),रतन महादेव दनाने ( वय.१९ वर्षे,रा.तळेगाव दाभाडे),अब्दुल सत्तार अब्दुल करीम ( वय.२३ वर्षे, रा.दापोडी ),अन्सार जुल्फिकार खान ( वय.२५ वर्षे, रा.दापोडी ),अरबाज रइस शेख ( वय.२० वर्षे,रा.दापोडी ),अर्जुन मोहनलाल भट ( वय.२४ वर्षे,रा.चिखली ) या सात पुरुष दरोडेखोरांसह  मीना अंकुश क्षीरसागर ( वय.४० वर्षे,रा.वाकड ),विध्या मनोज मगर ( वय.२३ वर्षे,रा.तळेगाव दाभाडे ) या दोन महिला दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे.तर किरण गिरी आणि हर्षद खान हे दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण औद्योगिक वसाहतीमधील व्ही टेक इंडस्ट्रीज इंडिया प्रा.लि.कुरुळी या कंपनीत ( दि.२५ ) जूनच्या मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अकरा दरोडेखोरांनी कंपनीच्या वॉल कंपाऊंडवरून आत प्रवेश करून,सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवून डोळ्यात मिरची पूड टाकून डांबून ठेवले.कंपनीतील महागडे तांबे,पितळ धातूचे टर्मिनल,लनग्ज,हारनेस, वायरिंग व सुरक्षा रक्षकांचे तीन मोबाईल असा २५,८७,२४७ रुपयांचा माल अशोक लेलँड कंपनीचा क्रीम कलरच्या टेम्पोमधून लुटून नेला होता.मात्र टेम्पोच्या नंबर प्लेटवर पांढरा कागद लावल्याने नंबर ओळखणे अवघड होते,परिसरातील इतर कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केल्यानंतर एका कॅमेऱ्यात टेम्पोच्या नंबर प्लेटचा पांढरा कागद गळून पडल्याचे निदर्शनास आले तसेच नंबर आढळून आला त्यावरून टेम्पोची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले होते.

पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी लुटलेला माल निगडी यमुनानगर येथे विक्री करत असताना,त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.यावेळी दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले तर सात पुरुष आणि दोन महिला दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.२५ लाख ७५ हजार ५४७ रुपयांचे तांबे,पितळ आदी स्पेअर पार्ट,४ लाख रुपयांचा टेम्पो,२ लाख ९० हजार रुपयांच्या सहा दुचाक्या,६८ हजार रुपयांचे मोबाईल फोन तसेच चाकू,लोखंडी कटवण्या असा ३३ लाख ३४ हजार ६९७ रुपयांचा मुद्देमाल अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त केला आहे.--------------

टॅग्स :ChakanचाकणArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी