शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

महाजनादेश यात्रा आज पुण्यात ; फ्लेक्स लावण्यावरून कार्यकर्ते भिडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 5:18 PM

पुणे शहरात काही तासात दाखल होणारी भाजपच्या महाजनादेश यात्रेची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण शहरात आगामी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. त्यामुळे यात्रा मार्गावर अक्षरशः इंचाइंचावर स्वागताचे फ्लेक्स बघायला मिळत आहेत

पुणे : पुणे शहरात काही तासात दाखल होणारी भाजपच्या महाजनादेश यात्रेची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण शहरात आगामी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. त्यामुळे यात्रा मार्गावर अक्षरशः इंचाइंचावर स्वागताचे फ्लेक्स बघायला मिळत आहेत. त्यातच फ्लेक्स लावण्यावरून कोथरूडमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचे वृत्त आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाल्यावर आज संध्याकाळी सहाच्या सुमारास  ही यात्रा पुण्यात येणार आहे.हडपसरपासून सुरुवात करून शहरातला विविध भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. फडणवीस यांची यात्रा शहराचा मोठा क्षेत्रातून जाणार असून त्यानिमित्ताने अनेक इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. बहुतेक त्यात नळस्टॉप चौक आणि काही भागात क्रेनच्या साहाय्याने मुख्यमंत्र्यांना विशाल पुष्पहार घातला जाणार आहे. 

शहरातील सर्व रस्त्यावर नगरसेवक आणि विद्यमान आमदार यांनी प्रचंड फ्लेक्स लावले आहेत. त्यात कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचाही समावेश आहे. त्यांनी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी म्हात्रे पुलापासून ते नळस्टॉप चौकापर्यंत प्रत्येक टप्प्यावर फ्लेक्स लावले आहेत. त्याच भागातील मेहंदळे गॅरेज चौकात फ्लेक्स लावण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की कार्यकर्त्यांमध्ये आपापसात हाणामारी झाली आणि त्यात काही जण जखमीही झाल्याचे वृत्त आहे. अर्थात दोन्हीही बाजूच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल न करणेच पसंत केल्याचे समजते. 

सध्या कोथरुडमधून उमेदवारी मिळवण्यासाठी कुलकर्णी आणि मोहोळ यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरु असून त्यातूनच कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु असल्याचे बघायला मिळाले. 

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkothrudकोथरूड