महादेव गावडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक
By Admin | Updated: January 25, 2017 23:54 IST2017-01-25T23:54:28+5:302017-01-25T23:54:28+5:30
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील व चिपळूण उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक महादेव श्रीपती गावडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती

महादेव गावडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक
टाकळी हाजी : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील व चिपळूण उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक महादेव श्रीपती गावडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने टाकळी हाजी परिसरात रात्री फटाक्यांची आतषबाजी करीत दिवाळी साजरी केली.
ते टाकळी हाजी गावात प्राथमिक शिक्षण घेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमधून पोलिस खात्याच्या सेवेत सन १९८५ मध्ये दाखल झाले. पहिल्यांदाच मुंबईतील धारावीसारख्या गुन्हेगारीचे उगमस्थान असणाऱ्या ठिकाणी काम केले. त्यानंतर सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये काम करताना या ठिकाणमधील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले. ‘गुन्हेगारांचा कर्दनकाळ’ म्हणून सातारा जिल्ह्यात त्यांना ओळखले जाते. ३१ वर्षांच्या सेवेमध्ये सन २००९ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेतील पहिले राष्ट्रपती पदक त्यांना मिळाले होते. गुन्हेगारांचे मानसशास्त्र ओळखून दंगल व हिंसक जमावात घुसून जमावावर नियंत्रण मिळविणाऱ्या पोलिस दलातील एक सक्षम अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात त्यांची ख्याती आहे. त्यांनी पोलिस दलातील विविध प्रकाराची चारशे रिवाडर््स प्राप्त केले आहेत. याव्यतिरिक्त पोलिस महासंचालकाकडून अतिविशिष्ट सेवा पदक, २००९ मध्ये राष्ट्रपती पदक व आता उल्लेखनीय सेवेबद्दल दुसरे राष्ट्रपती पदक मिळविणारे महादेव गावडे हे राज्यातील एकमेव आहेत.(वार्ताहर)