रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे ‘महादान... पुण्य महान’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST2021-09-19T04:10:37+5:302021-09-19T04:10:37+5:30

पुणे : पितृपक्षात दानाला महत्त्व आहे. याच उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज गेल्या सात वर्षांपासून ‘महादान.. पुण्य महान’ ...

'Mahadan ... Punya Mahan' campaign by Rotary Club of Pune Heritage | रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे ‘महादान... पुण्य महान’ मोहीम

रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे ‘महादान... पुण्य महान’ मोहीम

पुणे : पितृपक्षात दानाला महत्त्व आहे. याच उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज गेल्या सात वर्षांपासून ‘महादान.. पुण्य महान’ ही मोहीम राबवित आहे. या मोहिमेला रविवारी (दि.१९) पासून सुरुवात होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विनायक पेठे यांनी दिली. या मोहिमेत, वस्तुस्वरूपात मिळणारी मदत संस्थेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविली जाते. रविवारी स्नेह पॅरेडाईज, पौड रस्ता, कोथरूड येथे ‘महादान’ ही मोहीम आयोजित केली आहे. दि. ५ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. धान्य, वापरायोग्य कपडे तसेच रोख स्वरूपातही मदत स्वीकारली जाणार आहे. आर्थिक स्वरूपात मिळालेल्या निधीतून ससून रुग्णालयातील बालरुग्ण कक्षातील लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया विभागाला मदत करण्यात येणार आहे.

Web Title: 'Mahadan ... Punya Mahan' campaign by Rotary Club of Pune Heritage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.