शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महाबँकेच्या अधिकाऱ्यांवरील गुन्हा मागे घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 20:02 IST

डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला दिलेल्या नियमबाह्य कर्ज प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक रवींंद्र मराठे यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बँकींग क्षेत्रात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

ठळक मुद्देबँक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायदा व नियमानुसार काम करत असताना कायदेशीर संरक्षण आवश्यक महाबँक युनियन्स : कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा

पुणे : बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक रवींंद्र मराठे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई बेकायदेशीर आहे. या कारवाईमुळे बँकींग क्षेत्रात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे गुन्ह्यातून वगळवीत अशी मागणी युनायटेड फोरम आॅफ महाबँक युनियनने केली आहे. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला दिलेल्या नियमबाह्य कर्ज प्रकरणी पोलिसांनी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक मराठे यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. सध्या हे अधिकारी जामिनावर आहेत. बँक आॅफ महाराष्ट्र राष्ट्रीयकृत बँक असल्याने त्यामधील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सेंट्रल व्हीजिलन्स कमिशन (सीव्हीसी) व सक्तवसुली संचलनालय (ईडी) या संस्थांना आहेत. तसेच नियामक संस्था म्हणून रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाला (आरबीआय) कारवाईचे अधिकार आहे. राज्यसरकार आणि त्यांच्या संस्थांना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. या पोलीस कारवाईबाबत बँक कर्मचारी संघटनांनी विविध प्रश्न उपस्थित केले असून इंडियन बँक्स असोसिएशनने (आयबीए) वित्त मंत्रालय, आरबीआयकडे तीव्र आक्षेप नोंदविला आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई नंतर बँक आॅफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाची बैठक २९ जून रोजी झाली. त्यात व्यवस्थापकीय संचालक मराठे आणि आर. के. गुप्ता यांचे अधिकार तातडीने काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांवरील कारवाईबाबत वित्तमंत्रालय आणि बँकींग क्षेत्रातून तीव्र आक्षेप नोंदविल्यानंतर करण्यात आलेली ही कारवाई दुर्देवी असल्याचे महाबँक युनियनने म्हटले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बँकींग क्षेत्रात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अनेक अधिकारी कर्जासंबंधीचे निर्णय घेण्यास धजावणार नाहीत. त्यामुळे संबंधित गुन्ह्यातून बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे वगळावीत या कारवाईस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालकांना कार्यालयीन अधिकार पुन्हा द्यावेत, बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायदा व नियमानुसार काम करत असताना आवश्यक कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेbankबँकBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रPoliceपोलिस