माधुरी दीक्षितला २०० रुपये दंड

By Admin | Updated: September 12, 2014 12:26 IST2014-09-12T03:19:06+5:302014-09-12T12:26:22+5:30

लक्ष्मी रस्त्यावर ‘नो-पार्किंग’ मध्ये मोटार लावल्याने प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला वाहतूक पोलिसांनी २०० रुपये दंड केला

Madhuri Dixit gets 200 rupees fine | माधुरी दीक्षितला २०० रुपये दंड

माधुरी दीक्षितला २०० रुपये दंड

पुणे : लक्ष्मी रस्त्यावर ‘नो-पार्किंग’ मध्ये मोटार लावल्याने प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला वाहतूक पोलिसांनी २०० रुपये दंड केला. लक्ष्मी रस्त्यावर मोटारी उभ्या करण्यास बंदी असतानाही एका कार्यक्रमा निमित्त आली होती. त्यावेळी माधुरीने आपली मोटार तेथे उभी केली होती. गुरुवारी सायंकाळी लक्ष्मी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
आलिशान मोटारीमधून आलेली माधुरी कार्यक्रमासाठी दुकानामध्ये गेल्यानंतर मोटार (एमएच ०२, सीएल ६)‘नो-पार्किंग’मध्येच उभी करण्यात आली होती. काही वेळातच माधुरी दीक्षित दुकानामध्ये आल्याची बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे दुकानाच्या परिसरात गर्दी झाली होती. तसेच, काही काळ वाहतूककोंडीही झाली होती. साधारणपणे अर्धा ते पाऊणतास ही मोटार याच ठिकाणी उभी होती. वाहतूक पोलिसांच्या विश्रामबाग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन दंडाची पावती फाडली. नो-पार्किंगमध्ये मोटार उभी करणे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, अशा दोन कलमांखाली २०० रुपये दंड आकारण्यात आला. माधुरी दीक्षित-नेने आणि चालक करणसिंह गुरुदेवसिंग गील (रा. जुहू) यांच्या नावाने ही पावती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Madhuri Dixit gets 200 rupees fine