अक्षरभारती साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी माधव राजगुरू यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:12 IST2021-02-10T04:12:39+5:302021-02-10T04:12:39+5:30

अक्षरभारती पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा (दि.८) झाली. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत १ एप्रिल, २०२१ ते ३१ ...

Madhav Rajguru elected as President of Aksharbharati Sahitya Sanstha | अक्षरभारती साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी माधव राजगुरू यांची निवड

अक्षरभारती साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी माधव राजगुरू यांची निवड

अक्षरभारती पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा (दि.८) झाली. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत १ एप्रिल, २०२१ ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीसाठी नवी कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.

इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे निवडण्यात आले.

श्रीकांत चौगुले (कार्याध्यक्ष), रमेश बेंद्रे (उपाध्यक्ष), रत्नाताई चौधरी (कोषाध्यक्ष), वैशाली मोहिते (मुख्य सचिव), रूपाली अवचरे, सुरेश कंक (सहसचिव), प्रा. धनंजय भिसे (कार्यकारिणी सदस्य) यांची निवड झाली. याचवेळी कार्यकारी विश्वस्त म्हणून प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर व विश्वस्त म्हणून डॉ. शकुंतला काळे यांची नियुक्ती झाली.

------

गेल्या १८ वर्षांपासून अक्षरभारती संस्थेने उपनगरीय साहित्य संमेलने, व्याख्यानमाला, नवलेखकांसाठी लेखन कार्यशाळा, अनुवाद कार्यशाळा असे विविध साहित्यिक उपक्रम घेतले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात यापुढील काळात साहित्यिक अभिरूची वाढावी, लोकाभिमुख साहित्यसेवा व्हावी म्हणून संस्था कार्यरत राहील.

- माधव राजगुरू ,नवनिर्वाचित अध्यक्ष

Web Title: Madhav Rajguru elected as President of Aksharbharati Sahitya Sanstha