पुणे - देशातील आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि गॅस पुरवठ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये निर्माण होत असलेल्या भीतीच्या वातावरणाबाबत पुणे शहराचे आमदार हेमंत रासने यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे सांगत त्यांनी काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.
याबाबत आमदार रासने यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना पत्र पाठवून काही गॅस वितरकांकडून होत असलेल्या चुकीच्या प्रकारांकडे लक्ष वेधले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की देशात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून किमान सहा महिने पुरेल इतका साठा असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र तरीही काही वितरकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार नागरिकांकडून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार रासने यांनी पत्रात म्हटले आहे की, अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व गॅस वितरकांवर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व वितरकांवर देखरेख ठेवावी, तसेच गॅसचा काळाबाजार
Web Summary : MLA Hemant Rasane urges administration to prevent panic amid gas supply concerns. He assures sufficient stock, demands strict action against black marketing, and calls for monitoring distributors to avoid artificial scarcity.
Web Summary : विधायक हेमंत रासने ने गैस आपूर्ति चिंताओं के बीच दहशत रोकने का आग्रह किया। उन्होंने पर्याप्त स्टॉक का आश्वासन दिया, कालाबाजारी पर सख्त कार्रवाई की मांग की, और कृत्रिम कमी से बचने के लिए वितरकों की निगरानी का आह्वान किया।