शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पहिलीपेक्षा पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी कमी पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:56 IST

गरीब विद्यार्थ्यांना फटका; महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

पुणे : पालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला असून, पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठी ७३२ रुपये देण्यात आले आहे. त्याच शाळांमधील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मात्र केवळ ३६० रुपये देण्यात आली आहे. या भोंगळ कारभाराचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे.गणवेश व शालेय साहित्य खरेदीमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षांत महापालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया न राबविता निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी महापालिकेच्या शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याच्या बाजारातील दर लक्षात घेऊन एकत्रित रक्कम थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही रक्कम देताना झालेल्या सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्या आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रक्कमेचा प्रशासनाने गोंधळ केला आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशासाठी ७३२ रुपये, दुसरीसाठी ७५६ रुपये, तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७८२ रुपये, चौथीसाठी ८०४ असा चढत्या क्रमाने दर दिला आहे, त्यानुसार पुढे ५वी ते ७वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम देण्यात येणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशासाठी फक्त ७२० रुपये याप्रमाणे रकमेचे वाटप केले आहे. एका गणवेशासाठी विद्यार्थ्यांच्या हातात केवळ ३६० रुपये पडणार आहे. भांडार विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांच्याकडे विचारणा केली असताना, त्यांनी प्रिटिंग मिस्टेकमुळे हा प्रकार घडला असे स्पष्टीकरण दिले. मात्र, ही चूक मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमांबरोबर विद्यानिकेतनच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बाबतीतही घडली आहे. हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतरही विद्यार्थ्यांना वाढीव रक्कम देण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली गेलेली नाहीत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी