शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कमी सौर वादळांमुळे मान्सूनवर परिणाम शक्य : किरणकुमार जोहरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 12:14 IST

२०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे आणि कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे़

ठळक मुद्दे मान्सूनचा अभ्यास करताना व अंदाज वर्तवितांना सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास अतिशय महत्वाचासौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून हा कमजोर होण्याची दाट शक्यता सौर आवर्तनाचे २२ आणि २३ क्रमांकांच्या आवर्तनाच्यावेळी अनुक्रमे १९८६ आणि २००९ मध्ये अशाच प्रकारे दुष्काळ

पुणे : सूर्यावरील सौर धुमारे आणि चुंबकीय वादळे यांचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या अभ्यासातून दिसून आले आहे़. २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे आणि कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे़. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम पुढील दोन वर्षे मॉन्सूनवर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज मॉन्सूनचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे़. याबाबत किरणकुमार जोहरे म्हणाले, सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युत चुंबकीय क्षेत्रात देखील बदल घडवून आणते. पृथ्वीचे चुंबकीय आवरण वातावरण संतुलनाचे कार्य करते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असे ढोबळमानाने म्हणता येईल. मान्सूनचा अभ्यास करताना व अंदाज वर्तवितांना सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. २०१८ वर्षाप्रमाणे वर्ष २०१९ आणि २०२० हे २४ क्रमांकाच्या आवर्तनाचे (सायकल) व किमान सौर (सोलर मिनिमा) डागांच्या वादळांचे वर्ष आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्लुअन्सेस डाटा अ‍ॅनालिसीस सेंटर, (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत़. यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकिय वादळे होण्याची आहे. याचा थेट परिणाम मॉन्सूनवर होतो असे अभ्यासात आढळले आहे. जर सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून हा कमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग आणि या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, जो मध्य भारतात दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण करू शकतो. २०१९ आणि २०२० वर्षी काळजी घेण्याची गरज आहे. यापूर्वी सौर आवर्तनाचे २२ आणि २३ क्रमांकांच्या आवर्तनाच्यावेळी अनुक्रमे १९८६ आणि २००९ मध्ये अशाच प्रकारे दुष्काळ पडला होता़. भारतीय मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करताना भारतीय हवामान विभाग सूर्यावरील घडामोडीचा विचार करीत नाहीत़. त्यामुळे त्यांचे अंदाज चुकण्याची अधिक शक्यता असते़ २०१८ मध्ये या कारणामुळेच त्यांचा अंदाज चुकल्याचे जोहरे यांनी सांगितले़.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र