शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

कमी उत्पन्नाच्या मार्गावरील बसला दुपारची विश्रांती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 11:49 IST

पीएमपीचे जवळपास ३७५ मार्ग असून दररोज सुमारे १८ ते १९ हजार फेऱ्या होतात....

ठळक मुद्देज्या मार्गांवरील दैनंदिन उत्पन्न साधारणपणे ३० टक्क्यांपेक्षा कमीकमी उत्पन्न असलेल्या मार्गांवर ब्रोकन पध्दत फायदेशीर

पुणे : कमी उत्पन्न असलेल्या बसमार्गावरील तोटा कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ब्रोकन पध्दत सुरू केली आहे. त्यानुसार सकाळी व सायंकाळी या गर्दीच्या वेळेतच बस मार्गावर सोडल्या जात आहेत. तर मधल्या वेळेत चालक व बसला विश्रांती दिली जात आहे. त्यामुळे खर्चामध्ये कपात होण्याबरोबरच मार्गावरील तोटाही कमी होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पीएमपीचे जवळपास ३७५ मार्ग असून दररोज सुमारे १८ ते १९ हजार फेऱ्या होतात. पण यातील अनेक फेऱ्यांचे उत्पन्न एकुण खर्चाच्या निम्मेही नाही. तर अनेक बसचे दैनंदिन उत्पन्न ३० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे 'पीएमपी'ला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्येच आता ब्रोकन पध्दतीला बळ दिले जाणार आहे. 'पीएमपी'चे तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा ही पध्दत सुरू करण्यात आली होती. आता पुन्हा विविध मार्गांवर ब्रोकन पध्दत अवलंबली जात आहे. ज्या मार्गांवरील दैनंदिन उत्पन्न साधारणपणे ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा मार्गांवर ही पध्दत टप्प्याटप्याने सुरू केली जाणार आहे. मार्गांच्या सुसूत्रीकरणासाठी प्रशासनाने बीआरटी प्रमुख अनंत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मार्ग समिती स्थापन केली आहे. या समितीकडून ब्रोकनसाठीचे मार्ग निश्चित केले जात आहेत. तेजस्विनी बसला दुपारच्या सत्रामध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या बसचे मार्गही ब्रोकन करण्यात आले आहेत. साधारणपणे दुपारी १ ते ४ यावेळेत प्रवाशांची गर्दी कमी असते. यावेळेत संबंधित मार्गावरील फेऱ्या कमी केल्या जातात. सकाळी व सायंकाळच्या वेळेतच या मार्गावर बस सोडण्यात येतात. त्यामुळे मार्गावरील बसच्या खर्चात कपात होते. .........कमी उत्पन्न असलेल्या मार्गांवर ब्रोकन पध्दत फायदेशीर ठरत असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून सिध्द झाले आहे. त्यामुळे आता टप्प्याटप्याने कमी उत्पन्नाचे मार्ग निश्चित करून त्यावर ही पध्दत सुरू केली जात आहे. सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत ही पध्दत राबविली जात आहे. यामध्ये चालक व वाहक बदलण्याची गरज पडत नाही. तसेच दुपारी बस रिकाम्या धावल्यामुळे होणारे नुकसानही कमी होत आहे. - अनंत वाघमारे, अध्यक्ष मार्ग समिती व बीआरटी प्रमुख

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे