शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

कानिफनाथ घाटात प्रेमीयुगलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 6:31 PM

कानिफनाथ घाटांत एका तरूणासह अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघेही परप्रांतीय असून प्रेमप्रकरणातून सदर आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.

लोणी काळभोर : होळकरवाडी ( ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील कानिफनाथ घाटात एका तरूणासह अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघेही परप्रांतीय असून प्रेमप्रकरणातून सदर आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.      अभिमन्यू अर्जुनदास ( वय १९) व इतिदास ( वय १५, दोघेही रा. नबाबनगर, कुपवाह, दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल ) असे आत्महत्या केलेल्या तरुण - तरुणीचे नांव आहे. याप्रकरणी होळकरवाडीचे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष कालीदास रामदास झांबरे ( वय ३३, रा. होळकरवाडी - कानिफनाथ रोड, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार शनिवार ( ८ डिसेंबर ) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. झांबरे हे घरी असताना त्यांना तेथील स्थानिक नागरिकांनी होळकरवाडी - कानिफनाथ घाटात असलेल्या चौथ्या वळणावर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका झाडाच्या फांदीला ओढणी अडकवून एक मुलगा व एक मुलीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती दिली. ते घटनास्थळी तात्काळ पोहचले. त्यांनी ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना सदर माहिती दिली. पोलीस पथक पोहचले नंतर स्थानिक नागरिकांचे मदतीने दोन्ही मृतदेह खाली उतरवण्यात आले. 

            पोलीसांनी स्थानिकांकडे व तेथे जमलेल्या लोकांकडे चौकशी केली असता त्या दोघांना कोणीही ओळखत नव्हते. म्हणून पोलीसांनी दोघांची तपासणी केली असता त्यांना मयत मुलाच्या खिशामध्ये असलेल्या पाकिटात दोघांचेही आधारकार्ड सापडले. त्यावरून त्यांची ओळख पटली. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ससून रूग्णालय पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. यानंतर मुलाकडे मिळून आलेल्या मोबाईल वरून काही जनांशी संपर्क साधला असता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्याही घरची परिस्थिती हालाकीची असून ते कामानिमित्त या परिसरात आले होते. तर त्याचे एका मित्राने दोघेही एकमेकांवर प्रेम करत असल्याने अभिमन्यू हा इतिदास हिला घेऊन आला असल्याची माहिती पोलीसांना दिली आहे. त्यांचे कुटुंबीयांना सदर प्रकार कळवण्यात आला आहे. इतिदास हिचा एक भाऊ पुणे परिसरातील हॉटेल मध्ये काम करत असून त्याचेशी संपर्क साधून दोघांचे मृतदेह त्याचे ताब्यात देण्यात येणार आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत.  

टॅग्स :Deathमृत्यूLoni Kalbhorलोणी काळभोरWomenमहिला