टाटा पूल बनतोय प्रेमीयुगुलांचा अड्डा

By Admin | Updated: May 13, 2017 04:33 IST2017-05-13T04:33:24+5:302017-05-13T04:33:24+5:30

नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाण पूल हा प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. सायंकाळी सहानंतर या पुलावर तरुण तरुणींच्या जोड्या जमायला

Loverboy | टाटा पूल बनतोय प्रेमीयुगुलांचा अड्डा

टाटा पूल बनतोय प्रेमीयुगुलांचा अड्डा

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाण पूल हा प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. सायंकाळी सहानंतर या पुलावर तरुण तरुणींच्या जोड्या जमायला
सुरुवात होते. त्यानंतर अंधार वाढत गेल्यावर या युगुलांचे अश्लील चाळे सुरू होतात.
हा पूल शहराच्या विकासाचा सेतू म्हणून ओळखला जातो. भोसरी-हिंजवडी रस्ता येथूनच जातो. मात्र, शहरातील हा उड्डाण पूल मागील काही दिवसांपासून प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. सायंकाळी या प्रेमीयुगुलांच्या जोड्या पुलावर कडेला आपल्या गाड्या लावून त्यांच्या आडोशाला अश्लील चाळे करत बसलेले असतात. पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची खूप गर्दी असते. परंतु, याचे कुठल्याही प्रकारचे भान या प्रेमीयुगुलांना नसते. या पुलावरूनच पुढे बीआरटी मार्ग जातो. बीआरटी मार्गाच्या पुढील चौकात बसवलेले बरेचसे पथदिवे बंद आहेत. तेथेही प्रेमीयुगुलांच्या जोड्या अंधाराचा गैरफायदा घेतात.

Web Title: Loverboy