शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून प्रियकराने केली प्रेयसीसमोरच आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 21:29 IST

आपले तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आपल्या दोघांना लग्न करायचे होते. तुझं दुसऱ्याशी लग्न जमलं आहे आता माझा जगून काय उपयोग?

धायरी:

आपले तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आपल्या दोघांना लग्न करायचे होते. तुझं दुसऱ्याशी लग्न जमलं आहे आता माझा जगून काय उपयोग? असे म्हणत प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास घेत प्रियकराने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साकीब लतीफ इनामदार (वय २५, रा. माऊली नगर,दिघी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हि घटना सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉज येथे रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीब इनामदार व त्याची प्रेयसी यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी दुसऱ्या धर्मातील असून तिचे काही दिवसांपूर्वी लग्न जमले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता दोघेही गोळेवाडी येथील किनारा लॉजवर आले. तेथे दोघांमध्ये लग्नावरुन शाब्दिक वादावादी झाली. त्यावेळी तरुणाने आता तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे मी तरी जगून काय करु? असे म्हणत तिच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत हॉटेल मालकाने तात्काळ या घटनेची माहिती हवेली पोलिसांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस हवालदार विलास प्रधान, पोलीस नाईक गणेश धनवे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अन् ओढणीची गाठ लवकर सुटली नाही...खासगी कंपनीत काम करणारा साकीब इनामदार हा पिंपरी भागात राहत होता. तर त्याची प्रेयसीही त्याच भागात राहते. प्रेयसीचे लग्न जमल्याने तो तणावात होता. रविवारी भेटण्यासाठी ते हवेली पोलीस ठाणे हद्दीतील डोणजे येथील एका लॉजमध्ये आले. दरम्यान त्यांच्यात लग्नाच्या कारणावरून वाद सुरू असताना साकीबने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीने त्याला अडवण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या गळ्यातील ओढणीची गाठ काही सुटेना. तिने खाली जाऊन काउंटरवरून ओढणी कापण्यासाठी कात्री घेऊन येईपर्यंत त्याचा गळफास लागून मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी