शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कमळ, केवडा, पत्रींची किंमत कडाडली; कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:36 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंडई परिसरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती दरवर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक

ठळक मुद्देफुले, पत्री, दुर्वा असे साहित्य घेऊन अनेक शेतकरी, फुलविक्रेते खेडेगावातून येतात पुण्यात दरवर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक

 पुणे : कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईचा मोठा फटका बसला आहे. पूजेसाठी लागणारी फुले, पत्री, दुर्वा असे सर्वच साहित्य दर वर्षीपेक्षा दुपटीने महाग झाले आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कमळाचे एक फूल ५० रुपये, पत्री आणि दुर्वांची जुडी प्रत्येकी ५० रुपये, झेंडू, शेवंतीची फुले ८० रुपये पाव, केवडा पान ४० रुपये या दराने पूजेच्या साहित्याची विक्री झाली. लॉकडाऊनमुळे दर वर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक झाल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंडई परिसरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. केळीचे खुंट, पत्री, दुर्वा, झेंडूची फुले, शेवंतीची फुले, कमळ, केवडा या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. यंदाचे पूजेच्या साहित्याचे दर पाहून अनेकांनी आश्चर्य तर काही जणांनी नाराजीही व्यक्त केली. मर्यादित साहित्य आणि चढा दर असे चित्र मंडई परिसरात पहायला मिळाले. दर वर्षी पत्री, दुर्वा १०-२० रुपयांना मिळतात, तर कमळ २०-२५ रुपयांपर्यंत मिळते. यंदाच्या किमती मात्र शब्दश: गगनाला भिडल्या आहेत.

फुलविक्रेत्या पूजा शिर्के म्हणाल्या, ‘गेले पाच महिने लॉकडाऊन असल्याने, लोक घराबाहेर पडत नसल्याने आणि मंदिरे बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यवसायात थोडी तेजी आली आहे. मात्र, सर्वच साहित्य यंदा आम्हीही मार्केट यार्डमधून चढ्या दराने खरेदी केले. फुलांचे दर ऐकून ग्राहक राग व्यक्त करत आहेत. मात्र, आमचाही इलाज नाही. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही या व्यवसायात आहोत. एवढी महागाई आजवर कधीच पाहिली नव्हती.’----------------------फुले, पत्री, दुर्वा असे साहित्य घेऊन अनेक शेतकरी, फुलविक्रेते खेडेगावातून पुण्यात येतात. पत्री, दुर्वा असे साहित्य पानशेत, खडकवासला, मुळशी अशा जवळच्या ठिकाणांहून येते. कमळांची आवक मुंबईतून होते. केवडा लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, उदगीर अशा ठिकाणांहून येतो. लॉकडाऊनमुळे शेतकरी पुण्यार यायला घाबरत आहेत, त्यामुळे साहित्याची १०-२० टक्केच आवक झाली आहे. यंदा शेतकऱ्यांचे चार-पाच महिन्यांत मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची लागवड वाया गेली आहे, तर अनेकांनी व्यवसाय होणार नाही, या भीतीने लागवडच केलेली नाही. त्यामुळे यंदा महागाईने उच्चांक गाठला आहे.- सुहास सरपाले, सरपाले फ्लॉवर मर्चंट

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीbusinessव्यवसाय