ग्रामदैवतांसमोर लोटांगण
By Admin | Updated: October 1, 2014 00:50 IST2014-10-01T00:50:02+5:302014-10-01T00:50:02+5:30
निवडणुकीच्या रणधुमाळीत ग्रामदैवत कोपू नये, शुभकार्यात अरिष्ट येऊ नये, म्हणून उमेदवार ग्रामदैवतांची पूजा करीत आहेत.

ग्रामदैवतांसमोर लोटांगण
>पिंपरी : निवडणुकीच्या रणधुमाळीत ग्रामदैवत कोपू नये, शुभकार्यात अरिष्ट येऊ नये, म्हणून उमेदवार ग्रामदैवतांची पूजा करीत आहेत. त्यामुळे ग्रामदैवतांची आठवण न करणारे राजकीय लोक मंदिरात नारळ वाढवीत असताना दिसत आहेत.
विधानसभेची निवडणूक आता रंग भरू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीही झाली आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांनी थेट प्रचारास सुरुवात केली आहे. मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. ज्या अपक्ष उमेदवारांना अद्याप चिन्ह मिळाले नाही. ते लोकही ‘मी निवडणूक लढणार आहे’ असे मतदारांना सांगत आहेत.
गाव ते महानगर अशी 25 वर्षातील शहराची वाटचाल झाली आहे. तरीही मूळ गावठाणांच्या परिसरात काही प्रमाणात गावपण टिकून आहे. ग्रामदैवत कोपू नये म्हणून नारळ वाढविणो, लिंबू कापून टाकणो अशी प्रथा, परंपरा अजूनही बेस्टसिटी, मेगासिटीकडे वाटचाल करणा:या या शहरात जपली जात आहे. दैवतांवरील श्रद्धा कायम आहेत. गावांचा कायापालट झाला असला तरी भैरवनाथ, काळभैरवनाथ, खंडोबा, काळूबाई, विठ्ठल-रूक्मिणी, शनिदेव, महादेव, मारूती तसेच शिवारांवर म्हसोबा, मरिआई अशी ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. आजही या मंदिरात वार्षिक उत्सव होताना दिसतात. तसेच देवळातील तेलवात, पूजा अर्चा केली जाते.
यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात गाववाल्या उमेदवारांचा समावेश अधिक आहे. त्यांचेच वर्चस्व येथल्या राजकारणात आहे. त्यामुळे पूर्वपरंपरेने चालत आलेला उपचार येथील गाववाले करीत असतात. रणधुमाळी सुरू झाल्याने पदयात्र, फेरीची सुरूवात करण्यापूर्वी ग्रामदैवतांची पूजा करण्यावर उमेदवारांचे कार्यकर्ते भर देत आहेत. (प्रतिनिधी)
पदयात्र जाणा:या भागातील मंदिरासमोर नारळ वाढविण्यात येत आहे. त्यामुळे मंदिराच्या पाय:यांवर फोडलेले नारळ, खोबरे, करवंटय़ा दिसत आहेत. तसेच काही मंदिरात नारळांची माळही लावल्याचे दिसत आहे. कोणत्या मंदिरात नारळ फोडायचा, याची जबाबदारीही प्रचारप्रमुखांनी गावातील एका जाणत्या कार्यकत्र्यावर सोपविली आहे. हा कार्यकर्ता पूजेचे साहित्य घेऊन पदयात्रेच्या अग्रभागी असतो. शिव ओलांडली किंवा कुलदैवताचे मंदिर आले की, क्षणभर थांबून पूजा करून उमेदवार पुढे मार्गस्थ होताना दिसत आहे.