आंबेगाव तालुक्यात भात शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:00+5:302021-07-23T04:09:00+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण आहुपे खोऱ्यांमध्ये सोमवार (दि.१९) रोजी दुपारी पावसाने सूरुवात केली. मंगळवारी पावसाचा जोर ...

आंबेगाव तालुक्यात भात शेतीचे नुकसान
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण आहुपे खोऱ्यांमध्ये सोमवार (दि.१९) रोजी दुपारी पावसाने सूरुवात केली. मंगळवारी पावसाचा जोर काहीसा वाढला. परंतु बुधवार व गुरुवारी मुसळधार पावसाने अक्षश: थैमान घातले. डिंभे धरण परिसरामध्ये गेल्या चोविस तासामध्ये १२९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर डिंभे धरणामध्ये पाण्याचा साठा गुरूवारी सकाळपर्यंत ४३.७२ टक्के एवढा झाला आहे. आतापर्यंत ४६७ मी.मी. पाऊस पडला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात. भात खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे भात पेरणी करणे मोठे जिकरीचे झाले होते. परंतु नाइलाजवास्तव आदिवासी बांधव हा पाण्यातच भात पेरणी केली. या नंतर धुळवाफ व चिडवाफ झाल्यामुळे माती आड गेलेला दाणा उतला. परंतु माती वर राहीलेला दाणा न उतरल्यामुळे भात रोपे विरळ झाली. या नंतर पावसाने पंधरा ते वीस दिवस दडी मारल्यामुळे उतरुन आलेली भात रोपे पिवळी पडु लागली. काही रोपे लागवडी योग्य असतानाही चिखल करण्यासाठी पाणी नसल्यामुळे लागवडी रखडल्या. आदिवासी बांधवांनी विहीरी तलावातुन मोटारीद्धारे पाणी घेवुन भात लागवडी केल्या परंतु सोमवार पासुन पावसाने हलकी अशी सूरुवात केली परंतु बुधवारी (दि.२१) व गुरुवारी पावसाने अक्षश: थैमान घातले.यामुळे अनेक ठिकाणी भात खाचरांचे बांध फुटुन भात खाचरे गाडली गेली असुन भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे.बांधनींच्या भात खाचरांचे बांधांचे मोठे नुसकान झाले आहे.काही शेतकऱ्यांचे भात रोपांचे मुठ वाहुन गेले आहेत. बारा महिने मोठ्या आशेने काबाड कष्ट करुन ऐन वेळी होणाऱ्या निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भात उत्पादनवाढीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या भागातील निगडाळे कोंढवळ, तेरुंगण, राजपुर, तळेघर, चिखली, राजेवाडी, गोहे, डिंभा, पोखरी, जांभोरी, फलोदे, पाटण, म्हाळूंगे, साकेरी, पिंपरी, सावरली, आहुपे, बेंढारवाडी, डोण, तिरपाड, आघाणे, पिंपरगणे, असाणे, बोरघर, मेघोली, दिगद, अडीवरे, माळीण, बोरघर, फुलवडे, कोंढरे, आमडे, आसाणे भोईरवाडी न्हावेड,या गावामध्ये भात खाचर व भात रोपांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर,सदस्या इंदुताई लोहकरे तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सहाय्यक पोलिस निरिक्षक लहु थाटे, कार्यध्यक्ष प्रदीप आमोंडकर निलेश बोर्हाडे अंकीत जाधव यांनी आदिवासी भागाचा दौरा करुन नुसकान ग्रस्त भागाची पहाणी केली.
फोटो :-आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण आहुपे खोर्यांमध्ये अवकाळी मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी भात खाचरांचे बांध फुटुन भात रोपे गाडली गेल्यामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे.