अर्थसंकल्पाच्या फुगवट्याने महापालिकेला २०० कोटींचा तोटा

By Admin | Updated: May 7, 2014 01:29 IST2014-05-06T20:44:08+5:302014-05-07T01:29:06+5:30

गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पातील फुगवट्यामुळे पुणे महापालिकेला २०० कोटी रुपयांचा आर्थिक तोटा झाला आहे.

Loss of 200 crores for municipal corporation's budget | अर्थसंकल्पाच्या फुगवट्याने महापालिकेला २०० कोटींचा तोटा

अर्थसंकल्पाच्या फुगवट्याने महापालिकेला २०० कोटींचा तोटा

- वर्गीकरणाचे प्रस्ताव ढकलेले पुढे
पुणे : गेल्या वर्षी अर्थसंकल्पाचा फुगवटा करण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेला अपेक्षित उत्पन्नापेक्षा २०० कोटीचा वाढीव खर्च झाला आहे. ३१ मार्च अखेरची सर्व बिले अद्याप प्राप्त न झाल्याने हा तोटा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर स्थायी समितीने सुमारे ६७ लाखाचे वर्गीकरणाचे प्रस्ताव पुढे ढकलत पुढील आठवड्यात जमा-खर्चाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दोन वर्षांत महापालिकेचे अर्थिक उत्पन्नाने अद्याप ३००० कोटींचा टप्पा अद्याप ओलंडलेला नाही. तरीही फुगवटा केलेल्या अर्थसंकल्पाने ३६०० कोटीवरून ४००० कोटीपर्यंत उसळी मारली आहे. मात्र, त्याचे पडसाद स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत उमटले. महापालिकेला मार्च अखेर सुमारे २९०० कोटींचे उत्पन्न मिळाले असून, खर्च मात्र ३१०० कोटीहून अधिक वाढणार आहे. सध्या २०० कोटीचा तोटा दिसत असलातरी अद्याप खर्चा सर्व बिले जमा झालेली नाहीत. त्यामुळे ही तूट २०० कोटीहून अधिक वाढण्याची शक्यता स्थायी समितीच्या बैठकीत महापालिकेच्या अधिका-यांनी व्यक्त केली. तूट व तोटा भरून न निघाल्यास महापालिकेच्या बँकेतील ठेवी मोडाव्या लागतील, अशी भिती आयुक्त विकास देशमुख यांनी व्यक्त केली.
दरम्यान, स्थायी समितीच्या दुस-या महिन्यांच्या कार्यपत्रिकेवर सुमारे ६७ लाख रुपयांचे वर्गीकरणाचे प्रस्ताव आले होते. मात्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तूट आणि जमा-खर्चातील तोटा २०० कोटीहून अधिक वाढण्याची भिती प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे वर्गीकरणाचे प्रस्ताव पुढे ढकलण्यात आले आहेत. महापालिकेच्या जमा-खर्चाचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी सांगितले.
-------------------
होर्डींगमुक्त रस्त्यांचा प्रस्ताव...
शहरातील काही प्रमुख रस्त्यावर होर्डींग उभारण्यास बंदी करण्याचा आकाश चिन्ह विभागाचा प्रस्तावाला स्थायी समितीने संमती दिली. त्यानुसार कोणत्या रस्त्याची निवड करायची आणि त्याचा महापालिकाला होणारा अर्थिक तोटा यांचा विचार करून धोरण तयार करण्याचे आदेश आकाशचिन्ह विभागाला दिले आहेत, असे कर्णे यांनी सांगितले.
------------------
चार निरीक्षकांच्या बदल्या...
महापालिकेने १० मेपूर्वी शहरातील पथारी व हातगाडींचे सर्व्हेक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. मात्र, बनावट पावत्याद्वारे पथारींची नोंदणी करण्याचा प्रकार उजेडात आला. तसेच, ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत संथ गतीने काम करणा-या चार निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत आज देण्यात आले.
------------------

Web Title: Loss of 200 crores for municipal corporation's budget