तोतया पोलिसाने लुबाडले
By Admin | Updated: May 24, 2016 05:52 IST2016-05-24T05:52:14+5:302016-05-24T05:52:14+5:30
वाकड, हिंजवडी परिसरात वावरणाऱ्या एका टोळक्याने पोलीस असल्याची बतावणी करून दोन जणांची लुबाडणूक केली. रविवारी एकाच दिवशी भर दुपारी घडलेल्या या घटनांमुळे तोतया पोलिसांचा

तोतया पोलिसाने लुबाडले
काळेवाडी : वाकड, हिंजवडी परिसरात वावरणाऱ्या एका टोळक्याने पोलीस असल्याची बतावणी करून दोन जणांची लुबाडणूक केली. रविवारी एकाच दिवशी भर दुपारी घडलेल्या या घटनांमुळे तोतया पोलिसांचा शोध घेण्याचे आव्हान वाकड पोलिसांपुढे आहे.
रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास चार जणांच्या टोळक्याने तुलसी मोदीनामक व्यक्तीला अडवले. पोलीस असल्याचे सांगून त्याला मारहाण केली. त्याच्याकडील दोन मोबाइल, दहा हजारांची रोकड , घड्याळ, बँकेचा धनादेश, सोनसाखळी असा एकूण १९ हजारांचा माल लुबाडला. या घटनेपाठोपाठ दुपारी ३च्या सुमारास उज्ज्वल मैत्र या व्यक्तीचीसुद्धा अशीच लुबाडणूक केली. त्याच्याकडील ९ हजार ५०० रुपये रोकड, मोबाइल, घड्याळ, असा १५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पोलीस असल्याचे भासवून लंपास केला. दोघांनी फिर्याद दाखल केल्यानंतर वाकड पोलिसांपुढे तोतया पोलिसांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
हिंजवडी आणि वाकड भागात अशा पद्धतीने फसवणूक करण्याच्या विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून दुकानदारांची लुबाडणूक केली. (वार्ताहर)