पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास
By Admin | Updated: May 22, 2014 06:02 IST2014-05-22T06:02:21+5:302014-05-22T06:02:21+5:30
पोलीस असल्याची बतावणी करून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करणार्या दोघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली.

पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करणार्या दोघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांना २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मजलून हाजीअली इराणी (वय ३८,) व जावेद जाफरी (४३, रा. लोणी काळभोर) अशी आरोपींची नावे आहेत. अपर्णा दिवकर (वय ६२, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या पौड रस्त्यावरून पायी जात होत्या, त्या वेळी आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना १ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढण्यास सांगितले. तसेच, त्यापुढेच शिवतीर्थनगर येथे राहणार्या सुवासिनी चित्रे यांच्या हातातील १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ओढणीत बांधण्याच्या बहाण्याने लंपास केले. गुन्ह्यातील माल हस्तगत करायचा आहे. अशा प्रकारे आणखी काही गुन्हे घडले आहेत का, याचा तपास करायचा आहे.