शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाची उमेदवारांच्या '' डमी '' प्रतिनिधींवर असणार करडी नजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 12:18 IST

पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे.

ठळक मुद्देअन्यथा संबंधिताना बाहेर काढणार : जिल्हा प्रशासनाचा इशाराजिल्हा प्रशासनाची मतमोजणीच्या कामाची पूर्व तयारी सुरू शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी १४ टेबल असणार

पुणे : जिल्हा प्रशासनाकडून चारही लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीची तयारी केली जात आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात उमेदवारांबरोबर येणाऱ्या प्रतिनिधींवर प्रशासनाची नजर असणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांकडून पास घेवून डमी प्रतिनिधींना दुस-या उमेदवाराचे काम करता येणार नाही, असे अपर जिल्हाधिकारी तथा शिरूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी सांगितले.जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रि या सुरळीतपणे पार पडल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची पूर्व तयारी सुरू केली आहे. पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे. मतमोजणीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराला एका टेबलवर स्वत:चा एक प्रतिनिधी नियुक्त करता येईल. मात्र, त्यासाठी दिल्या जाणा-या पासचा गैरवापर केला जाऊ शकतो. ही बाब प्रशासनाने विचारात घेतली असून त्यावर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून याबाबत कल्पना दिली आहे.त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी वापरल्या जाणाºया पासचा काळाबाजार करता येणार नाही.रमेश काळे म्हणाले, प्रत्येक उमेदवाराला मतमोजणी केंद्रातील प्रत्येक टेबलवर एक प्रतिनिधी दिला जाणार आहे.या प्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या पासवर संबंधित प्रतिनिधीचे नाव, निवडूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नाव, विधानसभा मतदार संघाची व टेबलचा क्रमांकाची माहिती दिली जाईल. त्यामुळे संबंधित प्रतिनिधीला आपली जागा सोडून दुसऱ्या मतदार संघात किंवा दुस-या टेबलवर जाता येणार नाही. त्याचप्रमाणे एखादा प्रतिनिधी दुस-याच उमेदवारासाठी काम करत आहे,अशी तक्रार आल्यास किंवा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास संबंधित प्रतिनिधीला बाहेर काढले जाणार आहे. मतमोजणीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींचा खर्च संबंधित उमेदवाराच्या खर्चात धरला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना या प्रतिनिधींवर केलेला खर्चही दाखवावा लागेल.--- शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल असणार आहे. बॅलेट पेपर व सैनिकांच्या मतपत्रिकांची मोजणी करण्यासाठी स्वतंत्र टेबल असतील. शिरूरच्या मतमोजणी एकूण ८४ टेबलची व्यवस्था केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी सुमारे ६०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानpune-pcपुणेmaval-pcमावळshirur-pcशिरूरbaramati-pcबारामती