लोणीकाळभाेरला दुचाकीचाेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:16 IST2021-09-10T04:16:43+5:302021-09-10T04:16:43+5:30

खंडू नामदेव बेडगे (वय ३६, रा. बोरीसलगरा, ता. जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

Lonikalbhaerla two-wheeler Gajaad | लोणीकाळभाेरला दुचाकीचाेर गजाआड

लोणीकाळभाेरला दुचाकीचाेर गजाआड

खंडू नामदेव बेडगे (वय ३६, रा. बोरीसलगरा, ता. जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बुधवारी (दि. ८) पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुनील नागलोत व राजेश दराडे हे गस्त घालत असताना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत बेडगे हा पुणे-सोलापूर महामार्गावरून एकविना नंबरप्लेटची दुचाकी भरधाव वेगात चालवत घेऊन जात असताना दिसला. तपास पथकाने त्याचा शिताफीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्यास दुचाकीचे नंबर तसेच कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेऊन सखोल तपास करता त्यांने दुचाकी लोणी रेल्वे स्थानकातून चोरी केल्याचे सांगून आणखीन दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याने चंदनगर, वडकी व लोणी काळभोर येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

Web Title: Lonikalbhaerla two-wheeler Gajaad