लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्ह्यातील सर्वोत्तम लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:35+5:302021-09-02T04:24:35+5:30

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण दुर्गम भागांतील रहिवाशांना कोविडची लस उपलब्ध व्हावी तसेच ...

Loni Kalbhor Primary Health Center's best vaccination campaign in the district | लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्ह्यातील सर्वोत्तम लसीकरण मोहीम

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्ह्यातील सर्वोत्तम लसीकरण मोहीम

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण दुर्गम भागांतील रहिवाशांना कोविडची लस उपलब्ध व्हावी तसेच करून देण्याचा कोविडच्या तिसऱ्या लाटेत नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये बजाज ग्रुपने दिलेले व आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या लसीतून पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महालसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

१३ तालुक्यांतील ५५९ केंद्रांवर हे लसीकरण झाले. यामध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्ती, वरिष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि व्याधिग्रस्त (को-मॉर्बिड) व्यक्ती यांना प्राधान्याने लस देण्यात आली. हवेली तालुक्यात १२ प्राथमिक आरोग्य केेंद्रांत १८ ते ४४ वर्षांच्या १ हजार १५३ जणांना, तर ४५ वर्षांवरील ३ हजार २०५ अशी एकूण १४ हजार २५८ जणांना लस देण्यात आली आहे.

--

प्राथमिक आरोग्य केेंद्रनिहाय झालेले लसीकरण

- प्राथमिक आरोग्य केेंद्राचे नाव - १८ ते ४४ वर्षे/ ४५ वर्षांवरील / एकूण याप्रमाणे

लोणी काळभोर - २७६७/९६४/३७३१

पेरणे - १६६५/४८१/२१४६

फुरसुंगी - १३५९/४२३/१७८२

कुंजीरवाडी - ९९९/२७७/१२७६

ऊरूळी कांचन - ८५६/३०७/११६३

खडकवासला - ८२७/२१०/१०३७

वाडेबोल्हाई - ९७३/०/९७३

वाघोली - ६४३/१९६/८३९

खेडशिवापूर - ४९४/१७६/६७०

सांगरूण - ४६८/१०८/५७६

खानापूर - ३६९/१८०/५४९

देहू - ३९१/९९/४९०

--

कोट

सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ महाभारत शासनाच्या वतीने नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा आणि जीवनावश्यक गरजांचा लाभ मिळतो आहे. सद्यस्थितीत कोविड-१९ च्या विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी सर्व स्तरातून प्रशासनाला साह्य करण्याचे प्रयत्न होत आहेत. आम्ही आमच्या सर्व आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्याने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो आहोत.

डॉ. डी. जे. जाधव व रूपाली भंगाळे, प्राथमिक आरोग्य अधिकारी, लोणी काळभोर.

--

०१ लोणीकाळभोर लसीकरण

फोट ओळी : लोणीकाळभोर आरोग्यकेंद्राबाहेर लसीकरणासाठी लागलेली ग्रामस्थांची रांग

010921\01pun_1_01092021_6.jpg

फोट ओळी : लोणीकाळभोर आरोग्यकेंद्राबाहेर लसीकरणासाठी लागलेली ग्रामस्थांची रांग

Web Title: Loni Kalbhor Primary Health Center's best vaccination campaign in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.