लोणी काळभोर पोलिसांची दंडात्मक कारवाई, १० दिवसांत ८२ हजार ५०० रुपये केले वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST2021-04-25T04:10:19+5:302021-04-25T04:10:19+5:30

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली व नियोजनाप्रमाणे स्थानिक प्रशासनाचे मदतीने उरुळी कांचन पोलिसांनी विहीत ...

Loni Kalbhor police took punitive action, recovered Rs. 82,500 in 10 days | लोणी काळभोर पोलिसांची दंडात्मक कारवाई, १० दिवसांत ८२ हजार ५०० रुपये केले वसूल

लोणी काळभोर पोलिसांची दंडात्मक कारवाई, १० दिवसांत ८२ हजार ५०० रुपये केले वसूल

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र मोकाशी यांचे मार्गदर्शनाखाली व नियोजनाप्रमाणे स्थानिक प्रशासनाचे मदतीने उरुळी कांचन पोलिसांनी विहीत वेळेत दुकाने बंद न करून पारित केले नियमांचे उल्लंघन करणारे नागरिकांवर तसेच विनाकारण, विनामास्क फिरणारे नागरिकांवर १२ ते २३ एप्रिल रोजीचे दरम्यान एकूण १६५ दंडात्मक कारवाई करून ८२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. १२ एप्रिल रोजी उरुळी कांचन परिसरामध्ये कोराना सक्रिय रुग्णसंख्या ११९ अशी होती, ती संख्या २२ एप्रिल रोजी ८७ अशी झालेली असून कोरोना रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य नमूद केलेल्या कार्यवाहीमुळे सफल झाले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ पुणे नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, महिला पोलीस हवालदार भारती होले, पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड, संदीप पवार, सचिन पवार, पोलीस सोमनाथ चित्तारे, युवराज धोंडे तसेच उरुळी कांचन बिट मार्शल पाटोळे व चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: Loni Kalbhor police took punitive action, recovered Rs. 82,500 in 10 days