शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर दलात समाविष्ट : अधिसूचना जारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 18:45 IST

लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्यांबरोबरच हवेली पोलीस ठाणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्यात यावे, अशी गेल्या काही वर्षांपासूनची मागणी होती..

ठळक मुद्देहवेलीची मागणी अद्याप बाकी

पुणे : वाढत्या नागरिकीकरणामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील नागरीकरण झालेला भाग शहर पोलीस दलाकडे सोपविण्याची गेल्या काही वर्षांपासूनची मागणी राज्य शासनाने सोमवारी( (दि.२६) पूर्ण केली आहे. लोणी काळभोर आणि लोणीकंद पोलीस ठाणी आज शहर पोलीस दलात समाविष्ट करण्यात आले आहे. तशी अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आवश्यक कर्मचारी व गुन्ह्यांचे आदान-प्रदान प्रक्रिया येत्या २ ते ४ दिवसात पूर्ण करुन १ नोव्हेंबरपासून ही पोलीस ठाणी शहर पोलीस दलात समाविष्ट होणार आहे. येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार व इतर खर्च पुणे शहर पोलीस दलातून होणार आहेत. लोणीकंद पोलीस ठाणे परिमंडळ ४ व सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभागाला आणि लोणीकाळभोर पोलीस ठाणे परिमंडळ ४  सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभागाला जोडण्यात आले आहे. त्यामुळे परिमंडळ ४ व ५ च्या अंतर्गत ७ पोलीस ठाणे व येरवडा व वानवडी सहायक आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत ४ पोलीस येणार आहेत.लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्यांबरोबरच हवेली पोलीस ठाणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्यात यावे, अशी गेल्या काही वर्षांपासूनची मागणी होती. गृह विभागात काम करणारे अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर यासंबंधीचे सर्व प्रस्ताव तपासले़ व त्याचा पाठपुरावा केला. त्यातूनच एका महिन्याच्या आत हे दोन्ही पोलीस ठाणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र, याबरोबरच हवेली पोलीस ठाण्याचाही समावेश शहर पोलीस ठाण्यात करण्यात यावा, अशी मागणी होती. मात्र, त्याचा प्रस्ताव स्वतंत्रपणे पाठविला गेला असल्याने ती मागणी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. हवेली पोलीस ठाणे तसेच पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सीमेरेषेवरील पोलीस ठाण्यांच्या सीमांची फेररचना करण्याची आवश्यकता आहे.़़़़़़़़़़राज्य शासनाने अभिसूचना काढली आहे़ त्यादृष्टीने पोलीस अधिकारी, कर्मचारी, कागदपत्रांची देवाणघेवाण अन्य बाबींची पुर्तता येत्या २ ते ४ दिवसात करण्यात येईल.  १ नोव्हेंबरपासून संपूर्णपणे ही दोन्ही पोलीस ठाणी शहर पोलीस दलातून कार्यरत होतील.अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरLoni Kandलोणी कंदPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार