उद्योगनगरीत वडाला दीर्घायुष्य
By Admin | Updated: June 2, 2015 05:06 IST2015-06-02T05:06:32+5:302015-06-02T05:06:32+5:30
नव्याने विकसित झालेल्या शहरांमध्ये वड, पिंपळ, चिंचांची झाडे नामशेष होत असताना पिंपरी-चिंचवडमधील गावठाणाच्या परिसरात वडाची झाडे दिसून येतात.

उद्योगनगरीत वडाला दीर्घायुष्य
पिंपरी : नव्याने विकसित झालेल्या शहरांमध्ये वड, पिंपळ, चिंचांची झाडे नामशेष होत असताना पिंपरी-चिंचवडमधील गावठाणाच्या परिसरात वडाची झाडे दिसून येतात.
वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पुजल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाचे आता शहर परिसरात जाणीवपूर्वक जतन केले जात आहे. गाव ते महानगर अशी शहराची वाटचाल सुरू आहे. मात्र, शहरीकरणातही येथील गावपण टिकून आहे. शहरात सर्वसाधारणपणे वटपौर्णिमेला वडाची फांदी घरी आणून सुवासिनी पूजा करतात.
इतर शहरांच्या तुलनेत येथे समाधानकारक चित्र आहे. सुवासिनी वटपौर्णिमेला जुन्या वडाच्या झाडाची पूजा करतानाचे चित्र दिसून येते. तर महापालिकेच्या प्रयत्नातून शहरभरात नियोजनबद्धतेने वडाच्या रोपांची लागवड केली गेली आहे. अशी झाडे उद्याने, मुख्य रस्ते, शाळांच्या परिसरात बहरू लागली आहेत. (प्रतिनिधी)