शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा लोकल पाठोपाठ दौंड डेमु सेवेलाही हिरवा कंदील; दोन-तीन दिवसांत धावणार 'ट्रॅक'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 18:17 IST

ई-पास आवश्यक : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश

ठळक मुद्देपोलिसांचा ई-पास आवश्यक असून तो दाखविल्यानंतरच तिकीट दिले जाणारही गाडी दौंडमधून सकाळी  ७.४५ वाजता व पुण्यातून रात्री ७.३० वाजता सुटते

पुणे : लोणावळा लोकल पाठोपाठ पोलिस प्रशासनाने पुणे-दौंड दरम्यान डेमु सेवेलाही हिरवा कंदील दाखविला आहे. ही सेवा पुढील दोन-तीन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक असून तो दाखविल्यानंतरच तिकीट दिले जाणार आहे.

अनलॉकमध्ये टप्प्याटप्याने रेल्वे सेवा सुरू केली जात आहे. पुण्यातील उपनगरीसह सेवा सुरू करण्यासाठी पोलीस आयुक्तांवर समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आठवडाभरापासून पुणे-लोणावळा लोकल सुरू करण्यात आली आहे. लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी पोलिसांकडून ई-पास दिला जात असून हा पास दाखविल्यानंतरच स्थानकांवर तिकीट दिले जात आहे. लोकल सुरू झाल्यानंतर दौंड डेमु सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती.

आमदार राहुल कुल यांच्यासह दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना भेटून डेमु सुरू करण्याची विनंती केली होती. अखेर आयुक्तांनी ही मागणी मान्य करत डेमु सेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. लोणावळा लोकलप्रमाणेच डेमुमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करू शकतात, असे संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी सांगितले.--------------सध्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी पुणे ते दौंडदरम्यान डेमु गाडी सकाळी व सायंकाळी सोडण्यात येते. याच गाडीचा वापर या प्रवाशांसाठीच खुला केला जाणार आहे. सध्या गाडीचे चार डबे बंद असतात. या चार डब्ब्यांमध्ये ई-पास असलेल्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. ही गाडी दौंडमधून सकाळी  ७.४५ वाजता व पुण्यातून रात्री ७.३० वाजता सुटते.--------------सर्वसामान्य प्रवाशांनाही गाड्यांमध्ये प्रवेश द्यायला हवा. या प्रवाशांचे हाल होत असून सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. लोकललाही गर्दी नाही. इतर कर्मचाऱ्यांनाही प्रवेश दिल्यास त्यांची गैरसोय थांबेल.- हर्षा शहा, अध्यक्षा रेल्वे प्रवासी ग्रुप---------------

टॅग्स :Puneपुणेdaund-acदौंडlocalलोकलpassengerप्रवासी