लोणावळा महाविद्यालयास विजेतेपद

By Admin | Updated: December 24, 2016 00:28 IST2016-12-24T00:28:15+5:302016-12-24T00:28:15+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत लोणावळा महाविद्यालयाने

Lonavala College wins title | लोणावळा महाविद्यालयास विजेतेपद

लोणावळा महाविद्यालयास विजेतेपद

लोणावळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत लोणावळा महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. सहा खेळाडूंची श्रीरामपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता पुणे जिल्हा क्रीडा विभागात निवड झाली असल्याची माहिती प्रशिक्षक दिलीप महाजन यांनी दिली.
स्पर्धेमध्ये अक्षय तारे (५९ किलोगट), शेखर नाणेकर (६६ किलोगट) व आकाश बोंद्र (७४ किलोगट) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विक्रांत विटे यांनी ७४ किलो गटात द्वितीय क्रमांक मिळविला. महाविद्यालयाला मिळालेल्या या यशाचे व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर, सचिव दत्तात्रय पाळेकर, खजिनदार विजय दर्यानानी, प्रभारी प्राचार्य जिभाऊ बच्छाव, दिलीप महाजन यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)

Web Title: Lonavala College wins title