शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 01:57 IST

सव्वा लाखाचा फटका, चोरटे दुचाकीवरून फरार

सांगवी : सांगवी (ता. बारामती) येथे दागिने पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात चोरट्यांनी हातचलाखीने सोन्याचे दागिने लांबवल्याचा प्रकार घडला आहे. सव्वा लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, सांगवी येथील रेश्मा गणेश फडतरे यांच्यासह सासू सुनीता फडतरे, नणंद पल्लवी कोंढाळकर या तिघीजणी घरी असताना दोन व्यक्ती घरी आल्या. एकाने, ‘तुमच्याकडील तांब्याची भांडी, तसेच सोन्या-चांदीचे दागिने पॉलीश करून देतो,’ असे म्हणून फिर्यादी यांना तांब्याची भांडी आणायला सांगून कलशाला पॉलीश करून माघारी दिला. त्यानंतर पुन्हा चांदीच्या वस्तू मागून पायातील पैंजण काढून दिले व तेही पॉलीश करून माघारी दिले. पुन्हा सोन्याचे दागिनेही पॉलीश करू म्हणून कानातील सोन्याचे रिंगा, फुले व टॉप्स, तसेच गळ्यातील गंठण काढून इसमाकडे दिले. या वेळी फिर्यादी यांना स्टीलचा डबा आणायला सांगून त्यांच्याकडील लिक्विड ओतून थोडे पाणी टाकून त्यात हळद टाकली. घरात असलेल्या तिन्ही महिलांच्या समोर पॉलीशसाठी घेतलेले सर्व सोन्याचे दागिने स्टीलच्या डब्यात टाकले व त्यातील एक जण तो डबा हातात घेऊन म्हणाला की, गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून, थोडा वेळ गरम करा म्हणत फिर्यादी महिलेच्या मागे किचनपर्यंत येऊन क्षणात हातचालाखी करून दागिने काढून घेतले व डबा महिलेच्या हातात दिला. पाणी गरम करून झाल्यावर डब्यातील दागिन्याला चकाकी आली का पाहण्यासाठी सांगितले असल्याने, पंधरा मिनिटांनी तिघीही स्टीलच्या डब्यातील दागिने पाहण्यासाठी गेले असता त्यात फक्त कानातील एक फूल आढळून आले. बाहेर त्यांना पाहण्यासाठी आले असता मात्र दोघेही अज्ञात चोर तेथून दुचाकीवरून पळून गेले होते.अज्ञात चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचे २ तोळे वजनाचे साखळीतील गळ्यातील सोन्याचे गंठण, ३० हजार रुपये किमतीचे कानातील १ तोळे वजनाचे सोन्याचे टॉप्स, १५ हजार रुपये किमतीच्या अर्धा तोळ्याचे कानातील सोन्याच्या रिंगा, १५ हजार रुपये किमतीच्या कानातील अर्धा तोळे वजनाची सोन्याची फुले असे एकूण १ लाख २० हजार रुपयांचे दागिने फसवणूक करून पळून नेले आहेत. याबाबत फिर्यादी रेश्मा गणेश फडतरे (वय २८, रा. सांगवी, ता. बारामती) यांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञात चोरांविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :ThiefचोरtheftचोरीPuneपुणे