शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

लोकमत ‘सूर ज्योत्स्ना’ आज रंगणार : दिग्गजांच्या स्वरसाजात अनुभवा सप्तसुरांचा आविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 12:10 IST

स्व. ज्योत्स्नादेवी दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भक्तिसंगीत ते चित्रपटसंगीत अशी सांगीतिक सफर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

ठळक मुद्देमान्यवरांच्या उपस्थितीत पुणेकरांसाठी संगीत संध्या‘सूर ज्योत्स्ना २०१९’ च्या पुरस्काराचे मानकरी आर्या आंबेकर व शिखर नाद कुरेशीसुरेश वाडकर, सावनी रवींद्र व स्वप्निल बांदोडकर ही त्रयी विविध प्रकारची गीते सादर करणार

पुणे : ‘लोकमत सूर ज्योत्स्ना’ या कार्यक्रमाच्या प्रवेशिका घेण्यासाठी पुणेकरांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, पुण्यात शनिवारी (दि.२०) पंडित फार्म्स कर्वेनगर येथे सायं. ५.३० वा. स्व. ज्योत्स्नादेवी दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भक्तिसंगीत ते चित्रपटसंगीत अशी सांगीतिक सफर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

सूर ज्योत्स्ना पुरस्काराच्या निमित्ताने अनेक उदयोन्मुख गुणी कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. दरवर्षी दोन कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 

‘सूर ज्योत्स्ना २०१९’ च्या पुरस्काराचे मानकरी आर्या आंबेकर व शिखर नाद कुरेशी हे कलाकारही स्वरसाज चढविणार आहेत. या कार्यक्रमाचे हे सहावे पर्व आहे. दैवी आवाजाची देणगी लाभलेले सुरेश वाडकर, सावनी रवींद्र व स्वप्निल बांदोडकर ही त्रयी विविध प्रकारची गीते सादर करणार आहे. हे तीन गायक प्रथमच एका मंचावर दिसणार आहेत.  हा कार्यक्रम ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. डॉ. सागर गणपतराव बालवडकर (सचिव, खंडेराय प्रतिष्ठान) प्रस्तुत ‘लोकमत सूर ज्योत्स्ना’ या कार्यक्रमाचे आयोजन कोहिनूर ग्रुपच्या सहयोगाने करण्यात आले आहे. ४या कार्यक्रमाला सेलो, रिलायन्स, ब्रह्मश्री आणि सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स, खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, लोकमान्य मल्टीपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि., कार्निव्हल सिनेमाज, काका हलवाई, रेवेल क्रिएशन्स,     सुरेखा कम्युनिकेशन्स यांचे सहकार्य लाभले आहे. 

टॅग्स :PuneपुणेmusicसंगीतSuresh Wadkarसुरेश वाडकर Swapnil Bandodkarस्वप्निल बांदोडकरAarya Ambekarआर्या आंबेकर