शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांची पहाट बहरणार लोकमतच्या ‘स्वरचैतन्या’ने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 15:09 IST

‘दिवाळी पहाट’ सप्तसुरांच्या मंगलमयी आविष्कारांमध्ये साजरा करण्याची अनोखी पर्वणी रसिकांना मिळणार

पुणे : संगीत क्षेत्रातील ख्यातनाम कलाकार उस्ताद राशीद खान यांचे अभिजात स्वर, ‘मोहनवीणा’चे निर्मितीकार पं. विश्वमोहन भट यांचे बहारदार वादन अन् पं. योगेश समसी व पं. विजय घाटे यांचे तबल्यावरील थापेतून उलगडणारे ‘तालसौंदर्य’ अशा सुरेल आविष्कारांच्या अद्वितीय अनुभूतीतून रसिकांची दिवाळी पहाट ‘स्वरचैतन्या’ने बहरणार आहे.

डॉ. सागर गणपतराव बालवडकर प्रस्तुत आणि कोहिनूर, आयव्ही युनिव्हर्स, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, लाेकमान्य साेसायटी, व्हिजन, रांका ज्वेलर्स व एएनपी कॉर्पोरेशन यांच्या सहयोगाने रविवारी (दि. २३) ५.३० वाजता बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पस, सी. एम. इंटरनॅशनल स्कूल मैदान येथे ही स्वरचैतन्याची मनसोक्त उधळण होणार आहे. ‘दिवाळी पहाट’ सप्तसुरांच्या मंगलमयी आविष्कारांमध्ये साजरा करण्याची अनोखी पर्वणी रसिकांना मिळणार आहे.

गेल्या आठ वर्षांपासून ‘दिवाळी पहाट’चा उपक्रम राबविला जात असून, त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चातकाप्रमाणे दिवाळी पहाटची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रसिकांची दीपावली गायन आणि वादनाच्या अद्वितीय सादरीकरणांमधून गोड होणार आहे. कलाकारांना साबीर खान (सारंगी), विनय मिश्रा (हार्मोनिअम) साथसंगत करणार आहेत. आनंद देशमुख हे बहारदार निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाला काका हलवाई स्वीट सेंटर, सिद्धी असोसिट्स, एआयएसएसएमएस, सुरभि आणि मनोहर यांचा सहयोग लाभला आहे.

प्रवेशिका विनामूल्य

- एसकेपी कॅम्पस, बाणेर बालेवाडी- रांका ज्वेलर्स, आस्ट्रिक्स प्लाझा, डेरॉन हाइटस, बाणेर- लोकमान्य मल्टिपर्पस को-ऑप सोसायटी बँक, विधाते टॉवर, औंध- माय वर्ल्ड सोसायटी, बालेवाडी हाय स्ट्रीट, बाणेर- काका हलवाई स्वीट सेंटर, आयुर्वेद रसशाळेसमोर, कर्वे रोड, एरंडवणे- जयराज हाइट्स, न्यू दत्तनगर, शंकर कळवनगर, वाकड- अब्जा पॅव्हेलियन रागदारी सोसायटी, औंध-  महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

कधी : रविवारी (दि. २३) पहाटे ५.३०

कुठे : एसकेपी कॅम्पस ग्राऊंड, बालेवाडी

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतDiwaliदिवाळी 2022musicसंगीतSocialसामाजिक