शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट ; महेश काळे व राकेश चौरसिया यांची होणार जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 20:46 IST

लाेकमत आयाेजित दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये महेश काळे आणि राकेश चाैरसिया यांची जुगलबंदी हाेणार आहे.

पुणे : अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून असंख्य रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक महेश काळे आणि बासरीच्या मंजूळ स्वरांनी  रसिकमनावर मोहिनी घालणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची  ‘स्वरमैफल’ म्हणजे जणू रसिकांसाठी सुश्राव्य पर्वणी ठरते. या जादूई आविष्कारांची  ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.  युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने सोमवारी (दि. २८) पहाटे साडेपाचला महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित या  कलाविष्कारांनी रसिकांची दिवाळी पहाट   ‘स्वरचैतन्य’मयी होणार आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून लोकमत  ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाची रसिक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा महेश काळे यांच्या स्वरांनी रसिकांचा पाडवा  गोड होणार आहे. या कार्यक्रमात महेश काळे यांच्यासमवेत  राकेश चौरसिया यांच्या बासरीची जादूही अनुभवास मिळणार आहे. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर व पखवाजवर ओंकार दळवी साथसंगत करणार आहेत.  कार्यक्रमाला रांका ज्वेलर्स अणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे सहकार्य लाभले आहे.  याशिवाय काका हलवाई स्वीट सेंटर, खत्रीबंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ऊर्जा, लक्ष्मीनारायण चिवडा हे सहयोगी प्रायोजक आहेत. धीरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझिंग हे आऊटडोअर पार्टनर आहेत. मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध रांका ज्वेलर्स केंद्र 4लक्ष्मी रोड 4कर्वे रस्ता 4सिंहगड रस्ता 4रविवार पेठ.  लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा : डहाणूकर काॅलनी 4सेनापती बापट रस्ता.  4कर्वेनगर 4नवी पेठ 4सिंहगड रोड.  रसिक साहित्य : अप्पा बळवंत चौक 4बालगंधर्व रंगमंदिर 4यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 4काका हलवाई स्वीट सेंटर : 4आयुर्वेदिक रसशाळेसमोर, कर्वे रोड 4शॉप नं. २, चित्रलेखा अपार्टमेंट, आयडियल कॉलनी, पौड रोड. 4शॉप नं. 1 अलंकार पोलीस चौकी, नवसह्याद्रीे. 4अभिनव कला महाविद्यालयाजवळ, टिळक रोड. खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी : 4विठ्ठल मंदिर कॉर्नर, कर्वेनगर. 4गंगाधाम भाग्योदय अपार्टमेंट, सिंहगड रोड. 4शिवाजी पुतळा चौक, कोथरू ड. लोकमत कार्यालय : व्हीया व्हेंटेज बिल्डिंग, लॉ कॉलेज रोड.  वडगाव क ार्यालय : 4वडगाव खुर्द, सिंहगड रोड.

कार्यक्रम स्थळ   महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळदिनांक : सोमवार, २८ ऑक्टोबर  वेळ : पहाटे ५.३० वाजताकार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध. 

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतDiwaliदिवाळी