‘लोकमत’ हडपसर कार्यालयाचा वर्धापन दिन सोहळा स्थगित
By Admin | Updated: July 28, 2015 00:33 IST2015-07-28T00:33:17+5:302015-07-28T00:33:17+5:30
माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दु:खद निधनामुळे मंगळवारी होणारा ‘लोकमत’ हडपसर कार्यालयाच्या वर्धापन दिनाचा नियोजित कार्यक्रम

‘लोकमत’ हडपसर कार्यालयाचा वर्धापन दिन सोहळा स्थगित
पुणे : माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दु:खद निधनामुळे मंगळवारी होणारा ‘लोकमत’ हडपसर कार्यालयाच्या वर्धापन दिनाचा नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
देशातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. कलाम यांची ओळख होती. जगातील अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञांपैकी ते होते. देशातील युवकांना त्यांनी ‘मिशन २०२०’साठी प्रेरित केले. त्यांच्या निधनानिमित्त केंद्र सरकारने संपूर्ण देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. डॉ. कलाम यांचे ‘लोकमत’ परिवाराशीही अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘लोकमत’ परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘लोकमत’ हडपसर कार्यालयाचा वर्धापन दिन सोहळा स्थगित करण्यात आला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)