शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक : मावळमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढल्याने ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 13:27 IST

मावळ लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा टक्का वाढला आहे..

ठळक मुद्देमावळ मतदारसंघात २००९च्या तुलनेत २०१४ मध्ये १४.५ टक्के जास्त महिलांनी केले होते मतदान

- नारायण बडगुजर

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. २००९ मध्ये ४६.९८, तर २०१४ मध्ये ४६.९७ टक्के महिला मतदार होत्या. २०१९ मध्ये म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ४७.६४ महिला मतदार आहेत. अर्थात गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यंदा मावळ मतदारसंघातील महिलांचा टक्का वाढला आहे.  मावळ मतदारसंघात २००९ मध्ये १६,०४,८८६ मतदार होते. त्यात ७,५३,९१४ महिला, तर ८,५०,९७२ पुरुष मतदार होते. २०१४ मध्ये १९,५३,७४१ मतदार होते. त्यात ९,१७,७७० महिला तर १०,३५,९६१ पुरुष मतदार होते. यंदा २२,२७,७३३ मतदार असून, यात १०,६१,३१३ महिला, तर ११,६५,७८८ पुरुष मतदार आहेत. तसेच ३२ तृतीयपंथी तर ६०० सर्व्हिस अर्थात पोस्टल मतदार आहेत..0% तृतीयपंथी मतदारांची नोंद २०१४ पासून करण्यात आली. त्यामुळे २००९ मध्ये मतदारयादीत तृतीयपंथी मतदाराची नोंद नव्हती.1% २०१४ मध्ये मावळ मतदार संघात १० तृतीयपंथी मतदार होते. यातील एकाच मतदाराने मतदान केल्याने त्यांची टक्केवारी एक होती.1%  महिला मतदारांचा टक्का गेल्या निवडणुकीत किंचित घटला होता. मात्र २००९ आणि २०१४ च्या तुलनेत यंदा महिला मतदारांची संख्या एका टक्क्याने वाढली आहे. तसेच तृतीयपंथी मतदार वाढले असून पुरुष मतदारांचा टक्का घटला............लोकसभेच्या २००९ मधील निवडणुकीत ४२.९६ टक्के महिलांनी मतदान केले होते. मात्र २०१४ मधील निवडणुकीत ५७.४६ टक्के महिलांनी मतदान केले होते. अर्थात २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये १४.५ टक्के जास्त महिलांनी मतदान केले होते. यंदा महिला मतदारांचा टक्का वाढला असल्याने अर्धी खुर्ची नारीशक्तीच्या हाती आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWomenमहिलाVotingमतदान