शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

विद्यार्थी लढवणार लोकसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 01:31 IST

पीएच.डी.पर्यंतचे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळेना झाली... महाविद्यालय, शाळांमध्ये पाच-सहा हजार रुपयांमध्ये राबवून घेतले जात आहे...

पुणे : पीएच.डी.पर्यंतचे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळेना झाली... महाविद्यालय, शाळांमध्ये पाच-सहा हजार रुपयांमध्ये राबवून घेतले जात आहे... लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना प्रत्यक्षात जागा मात्र शंभर ते दीडशेच निघत आहेत. त्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधण्यासाठी सेट-नेट पात्रताधारक, पीएचडी, डीटीएड-बीएड पात्रताधारक, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे पदवीधर यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत पात्रताधारक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, त्यापैकी १६ मतदारसंघांतील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक १२ ते २५ हजार रुपयांपर्यंतचे डिपॉझिट भरण्याचा खर्च वर्णगी गोळा करून उभा केला जाणार आहे. विद्यापीठात शुक्रवारी होत असलेल्या बैठकीमध्ये याबाबतची पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.सेट-नेट पात्रताधारक समितीचे समन्वयक सुरेश देवडे यांनी सांगितले, उच्चशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न तीव्र झाले असतानाही कुठल्याच राजकीय पक्षाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. उच्चशिक्षितांची शासनाकडून सातत्याने फसवणूक होत आहे.यापार्श्वभूमीवर शासनापुढे आपल्या मागण्या तीव्रपणे मांडण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा, असे काही जणांना वाटत होते. मात्र बहिष्कार टाकून फार काही साध्य होणार नाही, त्यामुळे निवडणूक लढवून आपले उपद्रव्यमूल्य सिद्ध करावे असा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीतील प्रचाराच्या निमित्ताने जास्तीत जास्त बेरोजगारांपर्यंत पोहचता येईल.तसेच त्यांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणता येईल असे वाटल्याने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील सेट-नेट पात्रताधारक, पीएचडी, डीटीएड-बीएड पात्रताधारक, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे पदवीधर यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांचे मतदान जरी झाले तरी पात्रताधारक उमेदवार आपले उपद्रव मूल्य निश्चित दाखवून देऊ शकतील असा विश्वास त्यांना वाटतो आहे. त्यामुळे अत्यंत गंभीरपणे लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.>...तर विधानसभेला आमचीनक्की दखल घेतीलबेरोजगारांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडून यावी यासाठी आम्ही लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप मोठी आहे, त्यांनी एकत्र आल्यास लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचे उपद्रवमूल्य निश्चित दाखवून देऊ. त्यामुळे बेरोजगारांच्या प्रश्नांची सत्तेवर येणाऱ्या सरकारला नक्कीच दखल घ्यावी लागेल असे सेट-नेट पात्रताधारक समितीचे समन्वयक प्रा. सुरेश देवडे यांनी सांगितले.>केवळ सोशल मीडियामार्फतकरणार प्रचारलोकसभा निवडणूक लढवायची म्हटली तर त्यासाठी खर्च कुठून उभा करणार असा प्रश्न उच्चशिक्षित बेरोजगार उमेदवारांसमोर होता. लोकसभा निवडणुकीच्या डिपॉझिटची १२ ते २५ हजार रूपयांपर्यंतची रक्कम वर्गणीतून उभी करायची. त्यानंतरचा सगळा प्रचार फेसबुक, व्हॅॅट्सअ‍ॅप, मेसेज आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून करायचा अशी रणनीती या उमेदवारांकडून आखली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९