शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 15:23 IST

Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये जागावाटपात कटुता नव्हती. आम्ही एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार उभे केले नाही. आमची विचारधारा एक आहे, आमचे टारगेट एक आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची देशभरात रणधुमाळी सुरू आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरू आहेत. ठाकरे गट आणि शिवसेनेत  (शिंदे गटात) आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत सीएम शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. 

गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

"जे काम मोदीजींनी केले ते काँग्रेसने साठ वर्षात केले नाही. आम्ही विकासावर ही निवडणूक लढवत आहे. अटल सेतु, मुंबईतील मेट्रो ही कामे मोदींनी केली. लोकांच्या मनातील आलेल्या सरकारमुळे कामे मार्गी लागली आहेत. आमचे सरकार येण्याआधी यांच्या ईगोमुळे कामे अडकली होती. लोकांच्या कामासाठी यांनी ईगो बाजूला ठेवायला पाहिजे होता, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

'हे मुंबईकर, मुंबईकर म्हणतात पण मुंबईकरांसाठी यांनी काही केले का? मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर परत मुंबईत आणणे हेच आमचे व्हिजन आहे, डेव्हलपमेंट हाच आमचा मुद्दा आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीचा अजेंडा हा विकासाचा आहे. माझ एक प्रामाणित मत आहे, जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत होतो तेव्हा सावरकरांविरुद्ध काँग्रेसने अपशब्द वापरले होते, तेव्हा हिंदूत्व हिंदूत्व म्हणणारे शांत बसले होते. त्यांना सावरकर नको आहेत, त्यांना औरंगजेब चालतो हे दुर्देव महाराष्ट्राचे आहे . म्हणून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही काँग्रेसची भाषा बोलू लागलात, काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहे? धनुष्यबाण कोणाकडे आहे? असंही सीएम एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीमध्ये जागावाटपात कटुता नव्हती. आम्ही एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार उभे केले नाही. आमची विचारधारा एक आहे, आमचे टारगेट एक आहे. मोदी सरकार आणणे हाच आमचा अजेंडा आहे. आता मजबूत भारत आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४