शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 03:08 IST

लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे

पुणे : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. त्यात पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान येत्या २३ एप्रिल रोजी तर मावळ व शिरूर मतदारसंघाचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणूकीची सर्व तयारी पूर्ण केली आहे.आचारसंहितेच्या निमवालीचे काटेकोर पालन करणे गरजेचे असून या नियमावलीचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी सांगितले.केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे रविवारी सायंकाळी लोकसभा निवडणूकीची घोषणा करण्यात आली.त्यानंतर जिल्ह्यातही आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पुणे,बारामती ,मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवल किशोर राम बोलत होते. यावेळी ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आदी उपस्थित होते.नवल किशोर राम म्हणाले,जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यात पुणे व बारामती या दोन मतदार संघात 23 एप्रिल रोजी मतदान होईल.पुणे लोकसभा मतदार संघात सध्या २० लाख २४ हजार ७३१ मतदार असून या मतदार संघात १ हजार ९४४ मतदान केंद्र आहेत. तर बारामती मतदार संघात २० लाख ७७ हजार २७८ मतदार असून बारामतीत २ हजार ३०३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तसेच जिल्ह्यात मावळ मतदार संघात सर्वाधिक २२ लाख २७ हजार १३३ मतदार असून शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये २१ लाख ११ हजार ४६५ मतदार आहेत. मावळात पुणे जिल्ह्यासह पनवेल, कर्जत, उरण येथील मतदान केंद्रांचा समावेश आहे. मावळात एकूण २ हजार ४०५ मतदान केंद्रावर तर शिरूरमध्ये २ हजार २२७ मतदान केंद्रावर मतदान होईल.नवल किशोर राम म्हणाले, आचारसंहितेच्या काळात कायदा सुव्यवस्था राखली जाणार आहे.त्यासाठी पोलीस व इतर यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. सर्व सामान्य नागरिकांना सुद्धा निवडणूक काळात चूकीच्या घटनांचे चित्रिकरण किंवा छायाचित्र ‘सी- व्हिजल’ या मोबाईल अ‍ॅपवर टाकता येणार आहे. या अ‍ॅपवर नागरिकांकडून केल्या जाणा-या तक्रारीची दखल तात्काळ घेतली जाईल. तसेच संबंधित घटनेची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.शासकीय कामे थांबणारआचार संहिता लागू झाल्यामुळे आता कोणत्याही शासकीय योजनांची घोषणा करता येणार नाही.कोणत्याही प्रकारची शासकीय कामे होणार नाहीत. शासनाच्या कामाच्या निविदा किंवा जाहिराती प्रसिध्द होणार नाही.शासनाच्या बांधकाम विभागाची कामे थांबविली जातील.मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणता येणार नाही.लोकप्रतिनिधी शासकीय अधिका-यांबरोबर बैठक घेऊ शकत नाही.आचार संहितेचा भंग होणारे पोस्टर लावता येणार नाहीत.निवडणूक काळात होणाऱ्या गैरप्रकारांची तक्रार सी व्हीजल अ‍ॅपद्वारे घेतली जाईल. तथ्थ तपासून १०० मिनिटाच्या आत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल. निवडणूकी दरम्यान शस्त्र जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पैसे,शस्त्र,किंवा पैसे आणले जाऊ नयेत यासाठी जिल्ह्यात सुमारे 41 ठिकाणी चेकपोस्टवर तपासणी केली जाईल.- संदीप पाटील, ग्रामीण पोलिस अधिक्षक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Puneपुणे