लोहगावात घरफोडीमध्ये पावणेचार लाखांचा ऐवज चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:11 IST2021-03-22T04:11:55+5:302021-03-22T04:11:55+5:30
पुणे : फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून ३ लाख ७८ हजारांचा ऐवज चोरून ...

लोहगावात घरफोडीमध्ये पावणेचार लाखांचा ऐवज चोरीला
पुणे : फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून ३ लाख ७८ हजारांचा ऐवज चोरून नेला. त्याचबरोबर शेजारील फ्लॅटमध्येही घरफोडीचा प्रयत्न केला. ही घटना लोहगावमधील साठेवस्तीवर १९ व २० मार्चच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी पवन मेंगडे (वय ३२) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पवन लोहगावमधील आरपीएस टॉवरमध्ये राहायला आहेत. ते कुटुंबीयासह १९ मार्चला बाहेरगावी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील ३ लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख ७८ हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी सोसायटीतील दुस-या फ्लॅटमध्येही घरफोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गिरी तपास करीत आहेत.