‘आधी लगीन कोंढाण्याचं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:02+5:302021-03-09T04:12:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांनी माघ नवमी या दिवशी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ...

‘आधी लगीन कोंढाण्याचं’
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नरवीर तानाजी मालुसरे यांनी माघ नवमी या दिवशी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. यानिमित्ताने राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन किल्ले सिंहगड येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने व शिववंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. कीर्तनकार विश्वास कळमकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती-शक्ती अभिवादन केले. शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांच्यातील नात्याचे अनेक पदर उलगडून दाखविले.
या कार्यक्रमाचे आयोजन राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पवळे यांनी केले. या वेळी अनेक वर्षांनंतर सिंहगडावर टाळमृदंगाच्या वादनाने भक्ती शक्तीची भावना समस्त शिवप्रेमींमध्ये निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. राजे शिवराय प्रतिष्ठानचे शहर समन्वयक शिवाजी खरात, अमित जाधव, प्रशांत हरेकर, रणजित टेमघरे, सनी येळवंडे, अक्षय जाधव, केयुर बहिरट, स्वप्नील भोसले आदी यावेळी उपस्थित होते.