शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

लॉकडाऊनचे निर्बंध होताहेत शिथिल; पुण्यातून जिल्ह्याच्या अनेक भागात बससेवा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 23:14 IST

जिल्ह्यातही तालुके व महत्वाच्या ठिकाणांहून बस सोडण्यात येणार

ठळक मुद्देही बससेवा प्रामुख्याने कार्यालयीन वेळांनुसार असणार

पुणे : लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील केले जात असल्याने पुणे शहरातून जिल्ह्याच्या अनेक भागात एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातही तालुके व महत्वाच्या ठिकाणांहून बस सोडण्यात येणार आहेत. या बससेवा प्रामुख्याने कार्यालयीन वेळांनुसार असणार आहे. अद्यापही बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी प्रशासनाने मागील आठवड्यात पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातून मुळशीसाठी तर शिवाजीनगर येथून शिरूर व आळेफाटा या मार्गावर बस सुरू केली होती. त्यानंतर टप्प्याटप्याने मार्ग वाढविले जात आहेत. प्रवाशांची मागणी व प्रतिसादानुसार त्यामध्ये बदल केला जात आहे. एसटीने सुरू केलेल्या प्रमुख मार्गांमध्ये बारामती, भोर, शिरूर, सासवड, नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापुर, दौंड, निरा, जुन्नर, आळेफाटा, भिमाशंकर, वेल्हा, पौड या ठिकाणांहून थेट पुण्यासाठी बस असेल. सकाळी या ठिकाणांहून पुण्याकडे बस निघतील. तर याच बस संध्याकाळी पुण्याहून संबंधित ठिकाणी जातील. या बस सर्व थांब्यावर थांबतील. बससाठी कार्यालयीन वेळ निवडण्यात आली आहे. तिकीटदर पुर्वीप्रमाणेच असणार आहे. कोरोना संकट विचारात घेऊन सुरक्षित अंतर राखण्यासाठी निम्म्याच प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. तसेच मास्क बंधनकारक असून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. या प्रवासासाठी ई-पासची गरज नाही, असे एसटीच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.--------------पुणे शहर व जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले मार्ग -पुण्यात ये-जा : बारामती, भोर, शिरूर, सासवड, नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापुर, दौंड, निरा, जुन्नर, आळेफाटा, भिमाशंकर, वेल्हा, पौड.इतर मार्ग : बारामतीहून निरा, भिगवण, इंदापुर, वालचंदनगर, दौंड. तळेगाव-चाकण-शिक्रापुर. नारायणगाव-जुन्नर, जुन्नरहून देवळे, तांबे, दावडी, अंबोली, भिवाडे, घोडेगाव. भोरहून म्हसर, धोंडेवाडी, टिंटेघर, कोर्ले. सासवडहून यवत, वीर, राख, निरा. राजगुरूनगरहून पाबळ, बहिरवाडी, वांद्रा, वाडा, भोरगिरी, चिंचोशी, दावडी, साबुर्डी. मंचरहून कारखाना, कुरवंडी, चास-घोडेगाव, अवसरी.----

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड