शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: दारूची दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा; महिला संघटनांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 06:55 IST

लॉकडाउनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत वाढ झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगाकडे २६ एप्रिलपर्यंत देशभरातून ५८७ तक्रारी आल्या आहेत

पुणे : दारू पिण्याचे प्रमाण वाढले की हिंसाही आपोआपच वाढते. दारूची दुकाने सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे महिला अत्याचारांमध्ये वाढच होणार आहे. त्यामुळे हा निर्णय हा अत्यंत चुकीचा असून, या निर्णयाला आमचा विरोध आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी महिला संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

लॉकडाउनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत वाढ झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगाकडे २६ एप्रिलपर्यंत देशभरातून ५८७ तक्रारी आल्या आहेत. यात दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे भर पडण्याची भीती महिला संघटनांनी व्यक्त केली.दारूडा व्यक्ती फिजिकल डिस्टन्सिंग कसे पाळू शकणार? दारू मिळविण्यासाठी मारामाऱ्या सुरू होतील. दारू विक्रीमधून सरकारने महसूल मिळविण्याचा घेतलेल्या निर्णयातून अनेक प्रश्न निर्माण होतील. या निर्णयाला आमचा विरोध आहे. - साधना दधिच, नारी समता मंच

सरकारचा निर्णय चुकीचा आहे यात दुमत नाहीच. पण केंद्र सरकार राज्याला कोरोना काळात मदत करीत नाही. त्यामुळे राज्याला महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे. - किरण मोघे, सामाजिक कार्यकर्त्या.दारू पिऊन ही लोक कुटुंबातील महिलांसह इतर सदस्यांना त्रास देणार. यातच घरगुती हिंसाचारामध्येही वाढ होणार. ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’मुळे अपघात झाल्यास रूग्णालयांमध्ये रूग्णाला ठेवण्यासाठीही जागा नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. - डॉ. मुक्ता पुणतांबेकर, संचालिका, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस